पुरोहित संघाविरुद्ध महासभेत लक्षवेधी
By Admin | Updated: July 17, 2015 00:49 IST2015-07-17T00:49:31+5:302015-07-17T00:49:31+5:30
पुरोहित संघाविरुद्ध महासभेत लक्षवेधी

पुरोहित संघाविरुद्ध महासभेत लक्षवेधी
नाशिक : सिंहस्थ कुंभपर्वाच्या शुभारंभाला झालेल्या ध्वजारोहण सोहळ्याप्रसंगी मिळालेली अपमानास्पद वागणूक महापालिका पदाधिकारी व नगरसेवकांना भलतीच झोंबली असून, शुक्रवारी (दि.१७) होणाऱ्या महासभेत मानापमान नाट्याचा दुसरा अंक बघायला मिळणार आहे. महासभेत सत्ताधारी मनसेकडून पुरोहित संघाविरुद्ध लक्षवेधी मांडतानाच त्यांच्याकडे असलेला वस्त्रांतरगृहाचा ताबा पालिकेकडे घेण्याची मागणी केली जाणार आहे.
मंगळवार, दि. १४ जुलैला रामकुंडावर झालेल्या धर्मध्वजारोहण सोहळ्याप्रसंगी महापालिका पदाधिकारी व नगरसेवकांना हेतुपुरस्सर डावलण्यात आल्याने आणि समारंभस्थळीही जाण्यास पोलिसांकडून मज्जाव करण्यात आल्याने पदाधिकाऱ्यांसह नगरसेवकांमध्ये संतापाची भावना आहे.