अभोणा महाविद्यालयात गायकर व्याख्यानमाला

By Admin | Updated: February 2, 2016 23:01 IST2016-02-02T23:01:23+5:302016-02-02T23:01:58+5:30

अभोणा महाविद्यालयात गायकर व्याख्यानमाला

Gayatkar Lecturement at Abhona College | अभोणा महाविद्यालयात गायकर व्याख्यानमाला

अभोणा महाविद्यालयात गायकर व्याख्यानमाला


अभोणा : येथील डांग सेवा मंडळाच्या कला महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब गायकर व्याख्यानमाला संपन्न झाली.
व्याख्यानमालेचे उद््घाटन संस्थेचे उपाध्यक्ष शंकरराव मराठे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. देवीदास सोनवणे तर व्यवस्थापन समितीचे सदस्य शेखर जोशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ‘आत्मविश्वास यशाची गुरुकिल्ली’ या विषयावर प्रा. मानसी देशमुख यांनी मार्गदर्शन केले तर प्रा. देवेंद्र साबळे यांनी ‘छत्रपती संभाजी व शिवाजीराजे’, प्रा. डॉ. प्रसाद जोशी यांनी ‘जग जिंकूया’, प्रा. दिनेश नेरपगार यांनी ‘बहि:शाल शिक्षण स्वरूप, ध्येय व उद्दिष्ट्ये’ या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. गणेश रूपवते, प्रा. भास्कर बोरसे, प्रा. रोहिदास बोबडे, प्रा. एकनाथ वाठोरे, प्रा. किशोर पवार, प्रा. दिनकर भदाणे आदिंनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)

Web Title: Gayatkar Lecturement at Abhona College