गावकुस काव्यसंग्रहास पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:17 IST2021-09-06T04:17:54+5:302021-09-06T04:17:54+5:30

सदर पुरस्कार वाचनालयाचे अध्यक्ष योगेश गायकवाड यांनी जाहीर केले आहे, पुरस्काराचे हे सहावे वर्ष आहे. कादंबरी लेखनासाठी साहित्यसम्राट अण्णा ...

Gavkus Poetry Collection Award announced | गावकुस काव्यसंग्रहास पुरस्कार जाहीर

गावकुस काव्यसंग्रहास पुरस्कार जाहीर

सदर पुरस्कार वाचनालयाचे अध्यक्ष योगेश गायकवाड यांनी जाहीर केले आहे, पुरस्काराचे हे सहावे वर्ष आहे. कादंबरी लेखनासाठी साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे वाङ्मय पुरस्कार बाळासाहेब लभडे यांच्या ‘पिपिलीका मुक्तिधाम’ या कादंबरीस, स्व. जगन्नाथ शंकर गायकवाड स्मृती वाङ्मय पुरस्कार सुनील मंगेश जाधव यांच्या ‘मन भुकेत रंगलं’ या कथासंग्रहास, स्व. दौलतराव पंढरीनाथ गायकवाड स्मृती वाङ्मय पुरस्कार संदीप शिवाजीराव जगदाळे यांच्या ‘असो आता चाड’ या काव्यसंग्रहास, स्व. माणिकराव माधवराव जाधव स्मृती वाङ्मय पुरस्कार डॉ. राजेश गायकवाड लिखित ‘बाप नावाची माय’ या आत्मकथनास जाहीर झाला आहे. पुरस्कार वितरण ऑक्टोबर २०२१ मध्ये करण्यात येईल, असे वाचनालयाचे उपाध्यक्ष सुनील जगताप आणि सरचिटणीस माधवराव जाधव यांनी कळविले आहे. (फोटो ०५ गावकुस)

Web Title: Gavkus Poetry Collection Award announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.