नाशिकरोड परिसरात गुरुपौर्णिमा उत्साहात
By Admin | Updated: July 31, 2015 23:49 IST2015-07-31T23:48:16+5:302015-07-31T23:49:08+5:30
गुरूवंदन : शाळांमध्ये झाले विविध उपक्रम

नाशिकरोड परिसरात गुरुपौर्णिमा उत्साहात
नाशिकरोड : परिसरातील शाळा-महाविद्यालयांमध्ये गुरूपौर्णिमा विविध उपक्रमांद्वारे साजरी करण्यात आली.
कमलावती कोठारी शाळा
कमलावती कोठारी मुलींची प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक राजश्री खोडके यांच्या हस्ते गुरूंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. स्नेहल आव्हाड यांनी विद्यार्थिनींना गुरूंचे महत्त्व सांगितले. रेखा पगार, सुषमा यादव या शिक्षकांसह विद्यार्थिनींनी ‘गुरूने दिला ज्ञानरूपी वसा’ हे गीत सादर केले.
मनपा शाळा १२७
देवळाली गाव मनपा शाळा १२७ मध्ये मुख्याध्यापक सरस्वती गुंजाळ यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. सुनीता कर्डिले यांनी विद्यार्थ्यांना गुरू व शिष्याचे महत्त्व विशद करून सांगितले. यावेळी विद्यार्थी राहुल वराडे, स्नेहा राखपसरे, रूपाली हवालदार, वैधवी शिराळ, नयना कसबे आदिंनी शिक्षकांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. सूत्रसंचलन बी. एस. सांगळे व आभार अनिता लोहार यांनी मानले.
जेडीसी बिटको हायस्कूल
गुरूपौर्णिमेनिमित्त जेडीसी बिटको हायस्कूलमध्ये सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी शाळेच्या आवारामध्ये स्वखर्चाने १०० झाडे लावली. मुख्याध्यापक सी. एन. नानकर, पर्यवेक्षक जे. एन. खैरनार यांनी विद्यार्थ्यांना गुरूपौर्णिमेचे महत्त्व सांगितले. यावेळी संभाजी मुन्तोडे, के. पी. काळे, अमोल साठे, सुमित्रा रॉय, वृषाली वाघ, योगीता शिंदे, रोहिणी सोनवणे, एल. जी. घुगे, आशा भालेराव आदि उपस्थित होते.
भा. वि. जोशी हायस्कूल
उपनगर येथील भा. वि. जोशी महाराष्ट्र हायस्कूलमध्ये संस्थेचे अध्यक्ष ना. सी. पाटील, सचिव एस. बी. वैद्य यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते शारदा विद्या प्रसारक मंडळ, संस्थेतील शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. सुरेश घरटे, मोरे यांनी गुरूपौर्णिमेचे महत्त्व सांगितले. प्रास्ताविक मुख्याध्यापक दत्ता गोसावी यांनी केले. सूत्रसंचालन स्वाती पवार व आभार वृषाली जायभावे यांनी मानले.
नगरकर गुरूकुल विद्यालय
गुरूपौर्णिमेनिमित्त परिसरातून काढण्यात आलेल्या ग्रंथदिंडी व वृक्षदिंडीचे मुख्याध्यापक संगीता पाटील यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. वारकऱ्यांच्या वेशभूषेत दिंडीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी ‘वाचाल तर वाचाल, पर्यावरणाचा करा विचार वृक्ष लावा फार फार’ अशा घोषणा दिल्या.
आनंद महाराज कॉलेज
आनंद महराज आर्टस्, कॉॅमर्स, सायन्स कॉलेजमध्ये गुरूपौर्णिमेनिमित्त संस्थेचे संस्थापक दत्तात्रय धात्रक यांच्या हस्ते सरस्वती मातेचे पूजन करण्यात आले. प्रा. भालेराव यांनी गुरूंविषयी व प्रा. सूर्यवंशी यांनी लोकमान्य टिळक यांच्या कार्याची माहिती दिली. विद्यार्थ्यांनी शिक्षकांना गुलाबपुष्प व पेन देऊन सत्कार केला. सुलभा डांगे यांनी गुरू-शिष्याचे नाते उलगडून सांगितले. सूत्रसंचालन प्रा. सिल्केशा अहिरे व आभार प्रा. योगीता कडाळे यांनी मानले. (प्रतिनिधी)