आली गौराई अंगणी...

By Admin | Updated: September 3, 2014 00:45 IST2014-09-03T00:41:38+5:302014-09-03T00:45:28+5:30

आली गौराई अंगणी...

Gauri Gauri ... | आली गौराई अंगणी...

आली गौराई अंगणी...


नाशिक : ‘आली गौराई अंगणी, तिला लिंबलोण करा’ अशा ओळी गुणगुणत मंगळवारी घरोघरी गृहिणींनी ज्येष्ठा-कनिष्ठा गौरींचे स्वागत केले. प्रसन्न वातावरणात त्यांचे पंचोपचार पूजन करून विधिवत आवाहन करण्यात आले. उद्या (दि.३) गौरींचे पूजन, भोजन होणार आहे.
गौरींच्या स्वागताच्या तयारीसाठी गृहिणींची पहाटेपासून लगबग सुरू होती. सजावटीची तयारी पूर्ण झाल्यानंतर गौरींच्या मुखवट्याचे मंजूळ वाद्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले. दारात आल्यानंतर तांदळाचे माप ओलांडून त्यांना सर्व घराचे दर्शन देण्यात आले. काही ठिकाणी लेकुरवाळ्या गौरींचे आगमन झाले. सजविलेल्या, अलंकारांनी मढविलेल्या साच्यांवर मुखवट्यांची स्थापना करण्यात आली. त्यानंतर पूजन करून गौरींना भाजी, भाकरीचा नैवेद्य दाखविण्यात आला. उद्या गौरींचे पूजन, भोजन होणार असून, त्यांना सोळा भाज्यांचा नैवेद्य दाखविला जाणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Gauri Gauri ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.