गौराईचे कोठूरेत उत्साहात आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 15:50 IST2020-08-26T15:48:25+5:302020-08-26T15:50:15+5:30
निफाड : गौराई आली सोनपावलांनी असे म्हणत लाडक्या गौराईचे मंगळवारी कोठुरो आगमन झाले. तीन दिवसांची माहेरवासीख म्हणून गौराईचे स्वागत करण्यासाठी कोठुरे येथे महिला वर्गात उत्साह दिसून आला. आॅगस्ट महिन्यातील गौराईचे आगमन हा क्षण मांगल्याचा उत्सव म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे. गुरु वारपर्यत तीन दिवस गौरी गणपतीचा उत्सव चालणार आहे.

चैतन्याच्या सोनपावलांनी सुख समृद्धी घेवून मंगलमय वातावरणात चैतन्य घेवून येणाऱ्या महालक्ष्मी गौरीच्या स्वागतासाठी सम्पूर्ण घर आतुरतेने वाट पाहत असते. गौरीची स्थापना हि घराण्याच्या परंपरेनुसार वेगवेगळ्याळ्या पद्धतीने केले जाते. गणेश चातुर्ठीमध्ये गणपती बाप्पा इतकेच गौरीच्या आगमनाला महत्व दिले जाते. माहेरवासीन म्हणून समजल्या जाणार्या गौरीचे थाटामाटात आगमन झाले.
या उत्सवात श्री गणेशा प्रमाणेच गौरी समोर आरास करण्यात येते. गौरीला नटवून तठून मनोभावे पूजन केले जाते. नव्या साड्या, अंगभर दागिने, नथनी, मंगळसूत्र, कंबर पट्टा, राणीहार आदीसह दिवाळी प्रमाणे लाडू, करंजी,चकल्या, चिवडा, शंकरपाळे, पेढे, बर्फी, मिष्ठान्न पुरणपोळी सहित पक्वान्नाचे भरलेले भोजनाचे ताट, विविध प्रकारची मिठाई, श्रीफळ, फळे, आणि विवाहितेने भरलेली ओटी अशा पारंपारिक थाटात गौरीचे पूजन करण्यासाठी महिलाची लगबग दिसून आली. गौराई बसविण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आढळतात. काही ठिकाणी गौरी पाटावर मुखवटे तर काही उभ्या राहिलेल्या स्वरूपातील महालक्ष्मी आढळतात यासाठी लाकडी, लोखंडी धातूंचा उभे राहण्यसाठी वापर केला जातो. गहू, तांदूळ यांच्या राशी मांडतात.