पाच तारखेला होणार सभा
By Admin | Updated: October 3, 2014 00:38 IST2014-10-03T00:06:19+5:302014-10-03T00:38:10+5:30
नरेंद्र मोदींच्या नाशकातील पहिल्या सभेचा मान पंचवटीला

पाच तारखेला होणार सभा
नाशिक : आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांचे नियोजन पूर्ण झाले असून, मुंबईतून भाजपाच्या प्रचाराचा नारळ मोदींच्या हस्ते वाढविल्यानंतर थेट नाशिकलाच त्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपाने स्वबळावर निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता राज्यभर नरेंद्र मोदींच्या सभांचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला असून, त्यादृष्टीने येत्या रविवारी (५ आॅक्टोबर) महाराष्ट्रात दोन सभांचे नियोजन करण्यात आले असून, भाजपाच्या प्रचाराचा नारळ खऱ्या अर्थाने नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईतील ५ आॅक्टोबरच्या सभेने फुटणार आहे. त्यानंतर नाशिकला सायंकाळी ६ वाजता नाशिक जिल्'ातील भाजपा उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधानांची सभा पंचवटीतील तपोवन येथील साधुग्रामच्या जागेवर होणार आहे. त्या अनुषंगाने गुरुवारी (दि.२) सायंकाळी सहा वाजता भाजपाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची बैठक पंचवटीतील स्वामीनारायण मंदिरातील सभागृहात झाली. बैठकीस खासदार हरिश्चंद्र चव्हाण, शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी, विजय साने, प्रा.सुहास फरांदे यांच्यासह पदाधिकारी हजर होते. नरेंद्र मोदींची सभा पंचवटीत घेण्याचे कारण म्हणजे पंचवटी व नाशिकरोड येथील प्रभागात गुजराथी बांधवांची संख्या जास्त आहे. तसेच जिल्'ातील उमेदवारांच्या दृष्टीने पंचवटी हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने या सभेचे नियोजन करण्यात आल्याचे कळते.(प्रतिनिधी)