गॅस टॅँकर पुलावरुन नदीपात्रात कोसळला
By Admin | Updated: September 12, 2016 00:40 IST2016-09-12T00:38:22+5:302016-09-12T00:40:17+5:30
गॅस टॅँकर पुलावरुन नदीपात्रात कोसळला

गॅस टॅँकर पुलावरुन नदीपात्रात कोसळला
पांगरी : गुजरात राज्यातील बस
व गॅस टॅँकर यांची समोरासमोर
धडक होऊन गॅस टॅँकर पुलावरून खाली जाम नदीच्या कोरड्या पात्रात कोसळला. या अपघातात दोन्ही वाहनांचे चालक किरकोळ जखमी झाले.
सिन्नर-शिर्डी रस्त्यावर पांगरी शिवारात जाम नदीच्या पुलावर सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास सदर अपघात झाला.
अहमदाबाद-शिर्डी (जीजे १८ झेड ०८३६) ही सिन्नरकडून शिर्डीकडे जाणारी बस व समोरून येणारा गॅस टॅँकर (क्र. एमएच ०४ सीए २८२८) यांच्यात पांगरी गावाजवळ धडक झाली. त्यानंतर गॅस टॅँकर सुमारे पंधरा फूट खोल जाम नदीच्या कोरड्या पात्रात कोसळला.
त्यात बस व टॅँकरचा चालक किरकोळ जखमी झाले. बसमध्ये १३ प्रवासी होते. सुदैवाने कोणाला दुखापत झाली नाही. या प्रकरणी वावी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
सहायक निरीक्षक रणजित आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार एस. व्ही. शिंदे, पी. आर. आवारी अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहर)