गॅसने भरलेला टॅँकर पलटला; जिवीतहानी टळली

By Admin | Updated: May 31, 2014 02:03 IST2014-05-31T00:14:50+5:302014-05-31T02:03:06+5:30

आडगाव शिवार : रिक्षाला वाचविण्याच्या प्रयत्नात घडली घटना

Gas tank filled with gas; Livelihood survived | गॅसने भरलेला टॅँकर पलटला; जिवीतहानी टळली

गॅसने भरलेला टॅँकर पलटला; जिवीतहानी टळली

आडगाव शिवार : रिक्षाला वाचविण्याच्या प्रयत्नात घडली घटना

पंचवटी : नाशिककडून ओझरकडे जाणारा इण्डेन गॅस कंपनीचा गॅसने भरलेला टॅँकर सकाळच्या सुमाराला आडगाव शिवारातील मुख्य रस्त्यावर पलटी झाल्याची घटना घडली. गॅसने भरलेला टॅँकर असला तरी सुदैवाने कोणत्याही प्रकारची जिवीत वा वित्तहानी झाली नसल्याने नागरीकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
सकाळी साडेआठ वाजता मेडीकल फाटा चौफुलीवर ही घटना घडली. टॅँकर क्रमांक (जी जे १२ अे टी ६९५२) हा नाशिकडून मनमाड (पानेवाडी) येथे जाण्यासाठी निघाला सकाळी साडेआठ वाजता टॅँकर मेडीकल फाटयावरील चौफुलीवर येताच रिक्षाचालकाने रिक्षा आडवी मारल्याने रिक्षाला वाचविण्याच्या प्रयत्नात टॅँकरचालकाने ब्रेक मारला व टॅँकर पलटी झाला. गॅसने भरलेला टॅँकर असल्याने चालक व क्लिनरने तत्काळ उडी मारून पळ काढला त्यानंतर नागरीकांची पळापळ झाली. टॅँकर पलटी झाल्याबाबत मुख्य अग्निशामक नियंत्रण कक्षाने पंचवटी अग्निशामक दलाला माहीती कळविली. त्यांनतर घटनास्थळी पंचवटी अग्निशामक दलाचे पंडीत तिडके हे पथकासमवेत तर आडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाजीराव महाजन हे कर्मचार्‍यांसह घटनास्थळी दाखल झाले. गॅस टॅँकर पलटला असल्याने त्यातून गॅसगळती होत आहे की नाही याची खात्री केल्यानंतर वाहतूक सुरू करण्यात आली. गॅस टॅँकर पलटल्याने आडगावकडून नाशिककडे व नाशिककडून आडगाव बाजूने जाणार्‍या रस्त्यावर दुतर्फा वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. वाहतूक कोंडी झाल्यानंतर वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी वेळेवर दाखल न झाल्याने खाकी वर्दीतील कर्मचार्‍यांनाच वाहतूक पोलीसाची भूमिका बजवावी लागली.
दरम्यान दुपारी क्रेनच्या सहाय्याने पलटी झालेला टॅँकर रस्त्यात पुन्हा सरळ करण्यात आला होता. टॅँकरमध्ये गॅस भरलेला असल्याने व पलटी झाल्यामुळे वाहनाचे नुकसान झाले असुन कंपनीचे संबंधित अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाल्यानंतरच अपघातग्रस्त टॅँकर बाजूला करण्याचे काम करण्यात येणार असल्याचे पोलीसांनी सांगितले. (वार्ताहर)
इन्फो बॉक्स
रिक्षाचालकामुळेच अपघात
थांबा नसतांना रस्त्यात रिक्षा थांबविणे, एखाद्या प्रवाशाने हात दिल्यानंतर भर रस्त्यात रिक्षा उभ्या करणे, अशाप्रकारे एक ना अनेक तक्रारी बेशिस्त रिक्षाचालकांच्या असतात. आज आडगाव शिवारात गॅसने भरलेला टॅँकर पलटला या घटनेला रिक्षाचालक कारणीभूत असुन रिक्षाचालकाने रिक्षा आडवी मारली व रिक्षाला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाने बे्रक मारला त्यामुळेच टॅँकर पलटी झाल्याची घटना घडल्याची चर्चा आहे.

Web Title: Gas tank filled with gas; Livelihood survived

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.