सातपूरच्या बजरंगनगरमध्ये गॅस सिलिंडरचा स्फ ोट

By Admin | Updated: May 28, 2014 01:17 IST2014-05-28T01:08:01+5:302014-05-28T01:17:34+5:30

एकाच कुटुंबातील चौघे भाजले : प्रकृती गंभीर

Gas cylinders in Bajrangnagar, Satpur | सातपूरच्या बजरंगनगरमध्ये गॅस सिलिंडरचा स्फ ोट

सातपूरच्या बजरंगनगरमध्ये गॅस सिलिंडरचा स्फ ोट

एकाच कुटुंबातील चौघे भाजले : प्रकृती गंभीर
नाशिक : सातपूर-अंबड लिंकरोडवरील बजरंगनगरमधील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फ ोट झाल्याने कुटुंबातील चौघे जण गंभीररीत्या भाजल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली असून, त्यांना अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे़
याबाबत अधिक माहिती अशी की, सातपूर-अंबड लिंकरोडवरील बजरंगनगरमध्ये अरविंद कुमारसिंग (३५) हे पत्नी सुनीता देवीसिंग (३५), मुले संतनाथसिंग (७) व मधुसूदनसिंग (५) यांच्यासह राहतात़ मंगळवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास सिलिंडरमधून गॅसगळती होऊन त्याचा स्फ ोट झाला़ यामध्ये लागलेल्या आगीत अरविंद कुमारसिंग हे ४० टक्के, त्यांची पत्नी सुनीता ३५ टक्के, मुलगा संतनाथसिंग ३० टक्के, तर मधुसूदनसिंग ४० टक्के भाजले़
या घटनेनंतर या चौघांनाही सातपूर येथील सार्थक हॉस्पिटलमधून अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले़ या सर्वांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती रुग्णालयीन सूत्रांनी दिली आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Gas cylinders in Bajrangnagar, Satpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.