पास्ते येथे गॅस सिलिंडर तुटवड्याने ग्राहक हैराण

By Admin | Updated: July 6, 2014 00:16 IST2014-07-05T21:59:36+5:302014-07-06T00:16:41+5:30

पास्ते येथे गॅस सिलिंडर तुटवड्याने ग्राहक हैराण

Gas cylinders affected by the loss of gas at Patse | पास्ते येथे गॅस सिलिंडर तुटवड्याने ग्राहक हैराण

पास्ते येथे गॅस सिलिंडर तुटवड्याने ग्राहक हैराण

 

सिन्नर : तालुक्यातील पास्ते येथे गेल्या दोन महिन्यांपासून गॅस सिलिंडर वितरण व्यवस्था कोलमडली असून, ग्राहकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. येत्या सात दिवसांत गॅस सिलिंडर वितरण व्यवस्था सुरळीत न झाल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा माजी सरपंच नेताजी काकड यांच्यासह ग्राहकांनी दिला आहे.
पास्ते येथे हिंदुस्थान व भारत पेट्रोलियम या दोन्ही कंपनीचे मोठ्या प्रमाणात ग्राहक आहेत. येथे गेल्या चार महिन्यांपूर्वी हिंंदुस्थान कंपनीच्या शाह एजन्सीची सिलिंडर वितरण करणारी गाडी दर पंधरा दिवसाला येत होती. तथापि, गेल्या काही महिन्यांपासून ती एक ते दीड महिन्याआड येत आहे. त्यामुळे ग्राहकांना सिलिंडरअभावी अडचण सहन करावी लागत असल्याची तक्रार काकड यांनी केली आहे. ग्राहक वितरण गाडीच्या वेळापत्रकाप्रमाणे रविवारी आपले रिकामे सिलिंडर घेऊन रांग लावतात.
दिवसभर गाडीची प्रतीक्षा करूनही सिलिंडरची गाडी न आल्याने ग्राहकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. दूरध्वनीहून एजन्सी कार्यालयासोबत संपर्क साधल्यानंतर पुढल्या रविवारी येईल, असे सांगितले जाते. त्याचबरोबर उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याची तक्रार ग्राहकांनी केली आहे.
येत्या सात दिवसांत गॅस सिलिंडर वितरण व्यवस्था सुरळीत करण्याची मागणी काकड यांच्यासह ग्राहकांनी केली आहे. अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. (वार्ताहर)
’ तळवाडे दिगर : पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटल्यानंतरही पाऊस येण्याचे चिन्हे दिसत नसल्याने येथील शेतीबरोबरच पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे.

Web Title: Gas cylinders affected by the loss of gas at Patse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.