शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

८ लाखांची उधारीची रक्कम वसूल करून गॅस एजन्सीचा कामगार फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 18:00 IST

१ नोव्हेंबर २०१९ ते २० जून २०२० या कालावधीत संशयित पाटील याने विविध ग्राहकांकडून वसूल केलेली सुमारे ७ लाख ९० हजार ५४७ रूपयांची रक्कम वसूल करून ती एजन्सीच्या कार्यालयात जमा न करता परस्पर गायब करून पोबारा केला.

ठळक मुद्दे१३ ग्राहकांकडून सुमारे आठ लाख रूपयांची रोकडचा अपहार

नाशिक : येथील एका गॅस वितरकाच्या एजन्सीकडे सिलिंडर उधारीच्या रकमेची वसूली करणारा वसुली अधिकारी सुमारे ७ लाख ९० हजार ५४७ रूपयांची रक्कम विविध ग्राहकांकडून वसूल करून फरार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संबंधित फरार कर्मचाऱ्याविरूध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुष्कर बापू पाटील (रा.संभाजी चौक, सिडको) असे संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी लक्ष्मण संपतराव मंडाले (रा.साधुवासवाणी रोड) यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्र ार दाखल केली आहे. मंडाले यांची राणेनगर येथे भगवती गॅस एजन्सी आहे. या एजन्सीच्या माध्यमातून शहरातील सिडको, इंदिरानगर, जुनेनाशिक, बोधलेनगर, नाशिकरोड या उपनगरीय भागांमध्ये त्यांच्याकडून विविध ग्राहकांना घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडर मागणीनुसार पुरविले जातात. तसेच शहरातील विविध स्वीटची दुकाने आणि मोठ्या हॉटेल्सचालकांनाही ते व्यावसायिक गॅस सिलिंडर उधारीत पुरवितात. या उधारीची रक्कम वसूल करण्याची जबाबदारी पाटीलकडे त्यांनी सोपविली होती.१ नोव्हेंबर २०१९ ते २० जून २०२० या कालावधीत संशयित पाटील याने विविध ग्राहकांकडून वसूल केलेली सुमारे ७ लाख ९० हजार ५४७ रूपयांची रक्कम वसूल करून ती एजन्सीच्या कार्यालयात जमा न करता परस्पर गायब करून पोबारा केला. एका मिठाई दुकानदाराचा धनादेश पुन्हा आल्याने हा प्रकार उघडकीस आला. धनादेशाच्या मोबदल्यात ६५ हजार रूपये घेऊन संशयित पाटील याने नोकरीवर येणे परस्पर बंद केल्याने या सर्व फसवणूकीच्या प्रकार प्रकाशझोतात आला. मंडाले यांच्या फिर्यादीनुसार संशयित पाटीलविरूध्द तब्बल १३ ग्राहकांकडून सुमारे आठ लाख रूपयांची रोकडचा अपहार केल्याचे म्हटले आहे. यानुसार इंदिरानगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी