उद्यान विभाग उरला नावापुरता
By Admin | Updated: September 23, 2015 00:01 IST2015-09-23T00:01:04+5:302015-09-23T00:01:48+5:30
प्रभाग सभा : नगरसेवक आक्रमक

उद्यान विभाग उरला नावापुरता
सिडको : सिडको भागातील उद्यानांची परिस्थिती अत्यंत बिकट झाली असून दैनंदिन कामे तर सोडाच आपत्कालीन परिस्थितीतही अधिकारी लक्ष देत नसल्याचा प्रकार प्रभागसभेत नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी उघडकीस आणला. यावेळी उपस्थित सर्वच नगरसेवकांनी उद्यान विभागाचे सिडको प्रमुख राजेंद्र पांडे यांच्या कामकाजाविषयी नाराजी व्यक्त केली.
पावसामुळे रस्त्यात पडलेले वृक्ष तातडीने न हटविल्यामुळे एका व्यक्तीचा अपघात झाल्याने त्यास उद्यान विभागच जबाबदार असल्याचा आरोप बडगुजर यांनी केला. यावेळी त्यांनी मनपा आयुक्तांनाच सर्व घटनाक्रम सांगितल्यांनर यंत्रणा खडबडून जागी झाली. या प्रकरणाची दखल घेत आयुक्तांनी पडलेला वृक्ष तत्काळ हटविण्याचे आदेश संबंधितांना दिले. त्यानंतर रस्त्यात पडलेला वृक्ष उचलण्यात आला.उद्यान विभागाचे पांडे हे कधीच नगरसेवकांनी सांगितलेली कामे करीत नसल्याचा आरोप यावेळी
उपस्थित सर्वच नगरसेवकांनी केला.
नगरसेवकांनी केलेल्या आरोपानंतर पांडे यांनी सारवासरव करण्याचा प्रयत्न केला. त्यावर नगरसेवक उत्तम दोंदे म्हणाले, पांडे हे गेल्या अनेक महिन्यांपासून कोणतीच कामे करीत नसल्याने त्यांना उगीच का कामावर ठेवायचे? त्यांचंी सुट्टी करणे गरजेचे असल्याचेही दोंदे यांनी सांगितले. नगरसेवक शीतल भामरे, वंदना बिरारी, शोभा फडोळ, अश्विनी बोरस्ते, कल्पना चुंभळे, अॅड. अरविंद शेळके, शोभा निकम, हर्षा बडगुजर यांसह सिडको प्रभागातील सर्वच नगरसेवकांनी पांडे यांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली आहे. (वार्ताहर)