शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

वातावरणात गारठा : नाशिककरांना १२ वाजता घडले सुर्यदर्शन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 15:07 IST

थंडीचा कडाका वाढला असून बदलत्या हवामानाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे. बहुतांश नागरिकांना सर्दी-खोकल्याचा त्रास जाणवू लागला आहे.

ठळक मुद्देकमाल तापमानदेखील २८ अंशावरून शुक्रवारी थेट २६अंशापर्यंतसर्दी-पडसे, खोकल्याचे रूग्ण वाढले

नाशिक : ढगाळ हवामान...सुटलेला थंड वारा... घसरलेला किमान तापमानाचा पारा अशा वातावरणाचा सध्या नाशिककर आठवडाभरापासून अनुभव घेत आहे. शनिवारी (दि.४) चक्क नाशिककरांना सुर्योदय झाला की नाही, हे दुपारी १२ वाजेपर्यंत लक्षातच आले नाही, कारण पहाटेपासून दाटलेले मळभ हे दुपारी १२ वाजेच्या सुमारास काहीसे हटले आणि सुर्यकिरणे जमिनीवर पडली. त्यामुळे नाशिककरांनी पहाटेपासून दुपारपर्यंत थंडीचा कडाका अनुभवला.नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी बुधवारी (दि.१) थंडीच्या चालू हंगामातील सर्वाधिक कडाक्याची थंडी नाशिककरांनी अनुभवली. या हंगामातील निचांकी १०.३ अंशापर्यंत पारा घसरला. यामुळे नाशिक हे राज्यात सर्वाधिक थंडीचे शहर म्हणून नोंदविले गेले. पहाटेपासून नाशिककरांना हुडहुडी भरली होती. तसेच दिवसभर नाशिककरांनी उबदार कपडे परिधान करण्यास पसंती दिली. बुधवारी तापमानाचा पारा ११.६ अंशापर्यंत मोजला गेला. शुक्रवारी किमान तापमान ११.२ अंश इतके होते. डिसेंबरअखेर १३ अंशापर्र्यंत किमान तापमानाचा पारा स्थिरावत होता; मात्र नवीन वर्ष उजाडताच पारा थेट १० अंशापर्यंत खाली घसरला. याबरोबरच कमाल तापमानदेखील २८ अंशावरून शुक्रवारी थेट २६अंशापर्यंत खाली आले. यामुळे नाशिककरांना सध्या दिवसाही वातावरणता कमालीचा गारवा जाणवू लागला आहे. नागरिक दिवसाही स्वेटर, हाफ जॅकेट परिधान करून दैनंदिन कामे आटोपताना दिसून येत आहे. चाकरमान्यांनी कार्यालयांमध्ये उबदार कपडे परिधान करूनच कामे उरकण्यास प्राधान्य दिले. दुपारी दोन वाजेपासून शहरात पुन्हा ढग दाटून येऊ लागले. सुर्यप्रकाश फारसा कडक पडत नसल्याने वातावरणात गारवा टिकून आहे. अधुनमधुन सुर्य ढगाआड जात असल्याने थंडीची तीव्रता कायम असल्याचे दिसून येत आहे.उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरीमुळे शहराच्या किमान तापमानाचा पारा घसरू लागला आहे. नव्या वर्षाचा पहिल्या आठवड्यात थंडीची तीव्रता अधिक वाढण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. जम्मू-काश्मिरमध्ये बफवृष्टी जोरदार सुरू असून तेथील धबधबेदेखील गोठले गेले असून किमान तापमान उणे झाले आहे. यामुळे उत्तर भारत गारठला आहे. परिणामी या वातावरणाचा परिणाम उत्तर महाराष्टÑासह विदर्भ, मराठवाड्यावरही होऊ लागला आहे. विदर्भात झालेला अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे उत्तर महाराष्टÑाच्या वातावरणावरही परिणाम होताना दिसून येत आहे.सर्दी-पडसे, खोकल्याचे रूग्ण वाढलेथंडीचा कडाका वाढला असून बदलत्या हवामानाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे. बहुतांश नागरिकांना सर्दी-खोकल्याचा त्रास जाणवू लागला आहे. परिणामी खासगी दवाखान्यांसह सार्वजनिक रूग्णालयांमध्येही रूग्णसंख्या वाढली आहे. नागरिकांनी बदलत्या हवामानाच्या त्रासापासून बचाव करताना पाणी उकळून प्यावे, असा सल्ला डॉक्टरांकडून रुग्णांना दिला जात आहे. तसेच थंड गुणधर्माची फळे तसेच अन्य खाद्यपदार्थ खाणे टाळावे, असेही डॉक्टरांचे म्हणणे आहे. पहाटे तसेच रात्री घराबाहेर पडताना नाका-तोंडावर रुमाल बांधावा किंवा उबदार कापड व डोक्यावरदेखील टोपी न विसरता परिधान करावी, असे डॉक्टर सांगतात.

टॅग्स :NashikनाशिकTemperatureतापमानweatherहवामान