जुन्या नाशिकमध्ये गॅरेजला आग; १२ दुचाकी भस्मसात

By Admin | Updated: February 13, 2017 18:53 IST2017-02-13T18:53:11+5:302017-02-13T18:53:11+5:30

१५ लाखांचे नुकसान : नागसेननगरमधील घटना

Garage fire in old Nashik; 12 Bike Fire | जुन्या नाशिकमध्ये गॅरेजला आग; १२ दुचाकी भस्मसात

जुन्या नाशिकमध्ये गॅरेजला आग; १२ दुचाकी भस्मसात



नाशिक : द्वारका परिसरातील नागसेननगरमधील एका गॅरेजला रविवारी (दि़१२) मध्यरात्रीच्या सुमारास लागलेल्या आगीत १२ दुचाकी वाहनांसह इतर साहित्य जळून खाक झाले असून, यामध्ये सुमारे पंधरा लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे़ गॅरेजची आग शॉकसर्किटमुळे लागली नसल्याचा दावा विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांनी केल्याने महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाजकंटकांनी हे कृत्य केल्याची चर्चा आहे़ दरम्यान, या आगीच्या कारणांबाबत पोलिसांचा तपास सुरू आहे़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार द्वारका सर्व्हिसरोडवरील नागसेननगरमध्ये राजू शर्मा यांचे शर्मा आॅटो इंजिनिअरिंग वर्कशॉप आहे़ या वर्कशॉपला मध्यरात्री साडेतीन वाजेच्या सुमारास अचानक आग लागली़ या आगीमध्ये १२ दुचाकी, इंजिनिअरिंगची मशिनरी तसेच दुकानातील इतर साहित्य जळून खाक झाले़ सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नसून, सुमारे पंधरा लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे़

Web Title: Garage fire in old Nashik; 12 Bike Fire