शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

गंजमाळ, भद्रकालीतील धार्मिक स्थळे बंदोबस्तात हटविली ;  नागरिकांनी विरोध केल्याने गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 00:33 IST

संवेदनशील समजल्या जाणाºया भद्रकाली आणि गंजमाळ येथील धार्मिक स्थळांचे अतिक्रमण प्रचंड पोलीस बंदोबस्तात हटविण्यात आले. अतिक्रमण काढताना स्थानिक नागरिकांनी विरोध केल्याने काहीकाळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती, परंतु यातून सामंजस्याने मार्ग काढीत अतिक्रमण काढण्यात आले. दिवसभरात १५ अतिक्रमणे हटविण्यात आली. दरम्यान, भद्रकाली मंदिराजवळील साक्षी गणेश मंदिराचे अतिक्रमण काढू नये, यासाठी माजी महापौर विनायक पांडे यांनी विभागीय अधिकाºयांना महापालिकेच्या ठरावाची फाइल दिली.

ठळक मुद्दे अतिक्रमण काढताना स्थानिक नागरिकांनी विरोध शहरातील आत्तापर्यंत शंभरपेक्षा अधिक अनधिकृत धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविण्यात आलेसाक्षी गणेश मंदिराचे अतिक्रमण काढण्यास उच्च न्यायालयाने स्थगिती

नाशिक : संवेदनशील समजल्या जाणाºया भद्रकाली आणि गंजमाळ येथील धार्मिक स्थळांचे अतिक्रमण प्रचंड पोलीस बंदोबस्तात हटविण्यात आले. अतिक्रमण काढताना स्थानिक नागरिकांनी विरोध केल्याने काहीकाळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती, परंतु यातून सामंजस्याने मार्ग काढीत अतिक्रमण काढण्यात आले. दिवसभरात १५ अतिक्रमणे हटविण्यात आली. दरम्यान, भद्रकाली मंदिराजवळील साक्षी गणेश मंदिराचे अतिक्रमण काढू नये, यासाठी माजी महापौर विनायक पांडे यांनी विभागीय अधिकाºयांना महापालिकेच्या ठरावाची फाइल दिली.  उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने गेल्या सहा दिवसांपासून शहर परिसरात वाहतुकीला अडथळा ठरणारे धार्मिक स्थळे हटविण्यास प्रारंभ केला आहे. या मोहिमेत शहरातील आत्तापर्यंत शंभरपेक्षा अधिक अनधिकृत धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविण्यात आले. सोमवारीदेखील भद्रकाली आणि गंजमाळ येथील धार्मिक स्थळे हटविण्यात आले. या मोहिमेसाठी मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. भद्रकाली येथील धार्मिक स्थळ हटविताना स्थानिक नागरिकांनी काहीसा विरोध करण्याचा प्रयत्न केला. त्यांची समजूत काढल्यानंतर अतिक्रमण विरोधी मोहीम राबविण्यात आली.गंजमाळ येथील श्रमिकनगर येथे एका धार्मिक स्थळाचे अतिक्रमण काढताना स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध करीत अतिक्रमण काढू नये अशी मागणी केली, तर स्थळाच्या बाजूचे बांधकाम स्वत:हून काढून घेतले. पूर्ण धार्मिक स्थळ काढण्यासाठी नागरिकांनी भावनेचा मुद्दा उपस्थित करीत विधीवत धर्मगुरूंच्या अधिपत्त्याखाली धार्मिक विधीनंतरच स्वत:हून अतिक्रमण काढून घेतले जाईल यासाठी त्यांनी मुदत मागितली. त्यानुसार पालिकेने त्यांना दोन दिवसांची मुदत दिली. मात्र महापालिकेच्या पथकाने धार्मिक स्थळाच्या मागील बाजूस असलेले वाढीव बांधकाम जमीनदोस्त केले. या बाजूलाच लागून असलेली दोन दुकानेही काढण्यात आली. दरम्यान, मंगळवारीही शहरात धार्मिक स्थळांविरुद्धची अतिक्रमण मोहीम सुरू राहणार असल्याचे पालिकेच्या अतिक्रमण विभागाने कळविले आहे.साक्षी गणेश मंदिर अतिक्रमण काढण्यास स्थगितीभद्रकाली येथील साक्षी गणेश मंदिराचे अतिक्रमण काढण्यास उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने येथून अतिक्रमण विरोधी पथक परतले. सोमवारी साक्षी गणेश मंदिराचे अतिक्रमण काढणार असल्याची चर्चा झाल्याने मंदिराजवळ गर्दी झाली होती. महापालिकेनेच या मंदिराच्या सुशोभिकरणासाठी परवानगी दिल्याची बाब मंदिराच्या विश्वस्तांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्याने अतिक्रमण काढण्यास न्यायालयाने स्थगिती दिली.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाTempleमंदिर