गांगुर्डे-कुटे यांच्यात काट्याची लढत
By Admin | Updated: February 13, 2017 00:23 IST2017-02-13T00:22:55+5:302017-02-13T00:23:06+5:30
गांगुर्डे-कुटे यांच्यात काट्याची लढत

गांगुर्डे-कुटे यांच्यात काट्याची लढत
नाशिक महापालिकेच्या निवडणुकीतील अनेक प्रभागात तुल्यबळ उमेदवार असून, प्रभाग १२ मध्ये भाजपाचे उमेदवार
शिवाजी गांगुर्डे आणि कॉँग्रेसचे उमेदवार शैलेश कुटे यांच्यात काट्याची लढत होण्याची शक्यता आहे.
शिवाजी गांगुर्डे मुळात कॉँग्रेसचे. १९९७ पासून चारवेळा सलग त्यांनी महात्मानगर ते बारा बंगला परिसरापर्यंतचे नेतृत्व केले आहे.
शैलेश कुटे यांनी स्वीकृत नगरसेवक म्हणून महापालिकेत पाच वर्षे काम केले असले तरी कॉँग्रेसचे माजी शहराध्यक्ष माजी महापौर शांतारामबापू वावरे यांचे भाचे म्हणून ते परिचित आहेत. याशिवाय शिवसेनेच्या वतीने कुणाल
भोसले, मनसेचे मिलिंद ढिकले, बसपाचे देवीदास सरकटे हे रिंगणात असून भाजपाचे उमेदवार प्रकाश दीक्षित हे भाजपाचे बंडखोर
असून ते अपक्ष निवडणूक लढवित आहेत.