कानडगाव सोसायटीच्या सभापतिपदी गांगुर्डे
By Admin | Updated: November 18, 2015 23:09 IST2015-11-18T23:08:18+5:302015-11-18T23:09:11+5:30
कानडगाव सोसायटीच्या सभापतिपदी गांगुर्डे

कानडगाव सोसायटीच्या सभापतिपदी गांगुर्डे
दरेगाव : चांदवड तालुक्यातील कानडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या सभापतिपदी विजय गांगुर्डे, तर उपसभापतिपदी जयराम बीडगर यांची निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी आर. एन. दवते यांनी काम पाहिले. त्यांना सहाय्य सचिव शिंदे यांनी केले. यावेळी मच्छिंद्र बीडगर, जगन खेमनार, शंकर लगदिरे, श्रीराम कुशारे, भागा कुशारे, रवि देवरे, शिवाजी गांगुर्डे, रवि गांगुर्डे, दगू गांगुर्डे, उत्तम गांगुर्डे, निवृत्ती गांगुर्डे, मांगू जगताप, संजय बीडगर आदि उपस्थित होते. नूतन सभापती, उपसभापती यांनी आपणावर सभासदांनी व संचालकांनी दाखविलेला विश्वास सार्थ करू, त्यास तडा जाऊ देणार नाही, असे सांगितले. (वार्ताहर )