गँगस्टर डी. के. राव अखेर न्यायालयात हजर
By Admin | Updated: November 28, 2014 00:08 IST2014-11-28T00:08:29+5:302014-11-28T00:08:43+5:30
हत्त्या प्रकरण : पुढील सुनावणी ५ जानेवारीला

गँगस्टर डी. के. राव अखेर न्यायालयात हजर
नाशिक : २००३ मध्ये नाशिकरोडच्या मध्यवर्ती कारागृहात झालेल्या ओ. पी. सिंग हत्त्येप्रकरणी गुंड छोटा राजन याचा मुख्य हस्तक, कुख्यात गँगस्टर डी. के. राव यास सुनावणीसाठी जिल्हा न्यायालयात आज हजर करण्यात आले.
अंडरवर्ल्डमध्ये सक्रिय असलेल्या ओ. पी. सिंग याची नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात सन २००३ मध्ये रहस्यमयरीत्या हत्त्या झाली होती. हे प्रकरण यामुळे चांगलेच गाजले होते. यात छोटा राजन टोळीच्या डी. के. राव याच्यासह १७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यानच्या काळात यातील तिघे मयत झाले असून, उर्वरित चौदा जणांविरु द्ध सुनावणी सुरू होत आहे. सध्या तळोजा कारागृहात असणाऱ्या डी. के. राव यास सुनावणीस हजर करण्यासाठी न्यायालयाने प्रॉडक्शन वॉरंट काढले होते. त्यानुसार त्यास प्रचंड बंदोबस्तात आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. या प्रकरणाची नियमित सुनावणी जानेवारीपासून सुरू होणार आहे. संशयितांच्या वतीने अॅड. अविनाश भिडे, अॅड. प्रधान, अॅड. शैलेश साबद्रा काम पाहत आहेत. (प्रतिनिधी)छावणीचे स्वरूपसुरक्षेची काळजी म्हणून डी़ के . राव याला न्यायालयात कडेकोट बंदोबस्तात हजर करण्यात आले होते़ यावेळी असलेल्या प्रचंड बंदोबस्तामुळे न्यायालयास पोलीस छावणीचे स्वरूप आले होते, तर राव यास पाहण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती़ या प्रकरणाची पुढील सुनावणी ५ जानेवारीस होणार आहे़