गंगाघाटावर वाहतुकीची कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 00:08 IST2017-11-07T00:08:12+5:302017-11-07T00:08:19+5:30
गंगाघाट परिसरात सकाळच्या सुमारास रोजच वाहतुकीची कोंडी निर्माण होत असल्याने देवदर्शनासाठी तसेच अन्य धार्मिक विधीसाठी आलेल्या भाविकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. परिसरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलीस नेमलेले असले, तरी या पोलिसांचेही या वाहतूक कोंडीकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना स्वत:च पोलिसांची भूमिका पार पाडावी लागते.

गंगाघाटावर वाहतुकीची कोंडी
पंचवटी : गंगाघाट परिसरात सकाळच्या सुमारास रोजच वाहतुकीची कोंडी निर्माण होत असल्याने देवदर्शनासाठी तसेच अन्य धार्मिक विधीसाठी आलेल्या भाविकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. परिसरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलीस नेमलेले असले, तरी या पोलिसांचेही या वाहतूक कोंडीकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना स्वत:च पोलिसांची भूमिका पार पाडावी लागते.
पंचवटी परिसराला धार्मिक महत्त्व असल्याने पंचवटीत दैनंदिन शेकडो भाविक देवदर्शनाला येत असतात. येणारे भाविक मनपाच्या वाहनतळावर वाहने उभी करतात, तर काहीजण रस्त्यावर वाहने लावतात. काही स्थानिक नागरिक रस्त्यावर वाहने उभी करून वाहतुकीला अडथळा निर्माण करतात, तर भर रस्त्यावर फळविक्रेते हातगाड्या उभ्या करून वाहतूक कोंडीला निमंत्रण देतात. त्यातच भाविकांची वाहतूक करणारे रिक्षाचालक भाविकांना मंदिर परिसरात सोडून रिक्षा रस्त्यात उभ्या करतात. परिणामी पायी जाणाºया भाविकांना तसेच नागरिकांना संताप व्यक्त करावा लागत आहे. परिसरात वारंवार सकाळच्या सुमाराला वाहतूक कोंडीचे चित्र दिसत असले, तरी वाहतूक शाखेच्या कर्मचाºयांकडून कोणतीही कारवाई केली जात नाही. वाहतूक कोंडी करणाºया वाहनधारकांकडे वाहतूक शाखेचे लक्ष नाही, तर भररस्त्यात हातगाड्या उभ्या करून अतिक्रमण करणाºयांकडे मनपाच्या अतिक्रमण विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने वाहतूक कोंडीवर तोडगा काढणार कोण, असा सवाल नागरिकांनी केला आहे.