गंगावेत विवाहिता भाजून गंभीर जखमी
By Admin | Updated: October 9, 2015 23:36 IST2015-10-09T23:36:15+5:302015-10-09T23:36:56+5:30
गंगावेत विवाहिता भाजून गंभीर जखमी

गंगावेत विवाहिता भाजून गंभीर जखमी
चांदवड /दुगाव : चांदवड तालुक्यातील गंगावे येथील मयूरी सोमनाथ शेलार (२६), रा. गंगावे तिच्या राहत्या घरी कचरा पेटविण्यासाठी गेली असता, भाजली. तिला चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, ती ९५ टक्के भाजल्याने तिला अधिक उपचारासाठी नाशिक येथे रवाना करण्यात आले. याबाबत चांदवड पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली असून, हवालदार के. आर. डगळे, एच. बी. कदम तपास करीत आहेत. (वार्ताहर)