गंगावे पोटनिवडणुकीत ग्रामविकास पॅनल विजयी
By Admin | Updated: May 30, 2017 00:22 IST2017-05-30T00:22:14+5:302017-05-30T00:22:22+5:30
चांदवड : तालुक्यातील गंगावे ग्रामपंचायतीच्या अत्यंत चुरशीच्या व प्रतिष्ठेच्या झालेल्या निवडणुकीत ग्रामविकास पॅनलची सरशी होत तीनही उमेदवार निवडून आले.

गंगावे पोटनिवडणुकीत ग्रामविकास पॅनल विजयी
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदवड : तालुक्यातील गंगावे ग्रामपंचायतीच्या अत्यंत चुरशीच्या व प्रतिष्ठेच्या झालेल्या निवडणुकीत ग्रामविकास पॅनलची सरशी होत तीनही उमेदवार निवडून आले, तर सत्ताधारी नेत्यांच्या जनसेवा पॅनलला पराभवाचा धक्का बसला.
ग्रामविकास पॅनलचे नेतृत्व रघुनाथ (अण्णा) आहेर यांनी केले, तर सत्ताधारी गटाकडून विद्यमान सरपंच ज्ञानेश्वर पैठणकर, वाल्मीक (अण्णा) नरोटे यांनी स्वत: उमेदवारी करत जनसेवा पॅनलचे नेतृत्व सांभाळले होते. ग्रामविकास पॅनलकडून वॉर्ड क्रमांक १ मधून किरण रघुनाथ आहेर, मंदाबाई सोनवणे व वॉर्ड क्रमांक दोनमधून अंजनाबाई लहानू जाधव हे तीनही उमेदवार विजयी झाले.
विजयी उमेदवारांची गुलालाची उधळण, फटाक्याची आतषबाजी करत जल्लोषात स्वागत करण्यात आले.
या प्रसंगी रामदास नरोटे, प्रवीण देवरे, अनिल शेलार, पुंडलीक नरोटे, बापू नरोटे, शशी अहेर, अण्णा आहेर, भाऊसाहेब शिंदे, खंडू जाधव, संजय जाधव, लहानू जाधव, महेंद्र जाधव, पारसनाथ जाधव, बाळू जाधव
आदि कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते.