गंगापूरच्या युवकाचा खून संशयितांना अटक करण्याची मागणी : संतप्त नातेवाइकांकडून तोडफोड
By Admin | Updated: November 12, 2014 01:03 IST2014-11-12T01:03:02+5:302014-11-12T01:03:45+5:30
गंगापूरच्या युवकाचा खून संशयितांना अटक करण्याची मागणी : संतप्त नातेवाइकांकडून तोडफोड

गंगापूरच्या युवकाचा खून संशयितांना अटक करण्याची मागणी : संतप्त नातेवाइकांकडून तोडफोड
नाशिक : पूर्ववैमनस्यातून गंगापूर गावातील युवकाचा अज्ञात संशयितांनी धारदार हत्त्याराने वार करून खून केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी गंगापूररोडवर घडली़ या घटनेनंतर संतप्त युवकाच्या नातेवाइकांनी संशयितांच्या अटकेची मागणी करीत रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरील काचा फोडल्या़ दरम्यान, या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगापूर गावातील काकासाहेब विश्वास खैरनार (२२) हा रिक्षाचालक मंगळवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास अशोकस्तंभावरून रिक्षामध्ये (एमएच १५, ईएच-१२४३) प्रवासी घेऊन गंगापूरकडे चालला होता़ ही रिक्षा गंगापूररोडवरील हिराबागजवळ आली असता अज्ञात सहा ते सात संशयितांनी रिक्षा अडवून त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केले़ त्यामध्ये काकासाहेब खैरनारचा जागीच मृत्यू झाला़