गंगापूर एसटीपीचा तिढा सुटला सुनावणी पूर्ण: पालिकेकडून साडेसात कोटी जमा

By Admin | Updated: May 22, 2014 00:21 IST2014-05-21T22:55:08+5:302014-05-22T00:21:39+5:30

नाशिक : गोदावरी नदीचे प्रदूषण थांबविण्यासाठी आवश्यक गंगापूर येथील एसटीपी म्हणजेच मलनिस्सारण केंद्राचा मार्ग जवळजवळ मोकळा झाला आहे. जागा मालकाला देण्यासाठी साडेसात कोटी रुपयांची रक्कम महापालिकेने जिल्हा प्रशासनाकडे जमा झाली आहे. त्याचबरोबर नासर्डीतील प्रदूषण थांबविण्यासाठी पिंपळगाव खांब येथील मलनिस्सारण केंद्रासाठी सहा कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.

Gangapur STP's hearing concludes: Hundreds of crores deposits from the corporation | गंगापूर एसटीपीचा तिढा सुटला सुनावणी पूर्ण: पालिकेकडून साडेसात कोटी जमा

गंगापूर एसटीपीचा तिढा सुटला सुनावणी पूर्ण: पालिकेकडून साडेसात कोटी जमा

नाशिक : गोदावरी नदीचे प्रदूषण थांबविण्यासाठी आवश्यक गंगापूर येथील एसटीपी म्हणजेच मलनिस्सारण केंद्राचा मार्ग जवळजवळ मोकळा झाला आहे. जागा मालकाला देण्यासाठी साडेसात कोटी रुपयांची रक्कम महापालिकेने जिल्हा प्रशासनाकडे जमा झाली आहे. त्याचबरोबर नासर्डीतील प्रदूषण थांबविण्यासाठी पिंपळगाव खांब येथील मलनिस्सारण केंद्रासाठी सहा कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.
महापालिकेने गंगापूर येथील मलनिस्सारण केंद्राची पाच एकर जागा ताब्यात घेण्यासाठी कार्यवाही सुरू केली असताना जागा मालकाने न्यायालयात दाद मागितल्याने हा विषय रखडला होता. सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात राज्यशासनाने जागा मालकांचे म्हणणे ऐकून निर्णय घ्यावा, असे आदेशित केले. त्यानुसार जागा मालकाचे म्हणणे ऐकून घेण्यात आले असून, आता केवळ जिल्हाधिकार्‍यांच्या अंतिम निर्णयाची प्रतीक्षा आहे. दरम्यान गोदावरी गटारीकरण विरोधी मंचाने गोदावरी प्रदूषणाबाबत उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेच्या आधारे उच्च न्यायालयाने महापालिकेला गंगापूर आणि पिंपळगाव खांब येथील मलनिस्सारण केंद्रासंदर्भात कालबद्ध कार्यक्रम दिला आहे. त्यात आता गंगापूर येथील जागेसाठी महापालिकेच्या मिळकत विभागाने ७ कोटी ५२ लाख रुपये जिल्हा प्रशासनाकडे जमा केले आहे. तसेच पिंपळगाव खांब येथील ५ हेक्टर जागेसाठी ५ कोटी ९१ लाख रुपये जिल्हा प्रशासनाकडे जमा केले आहेत. त्यामुळे लवकरच या जागा महापालिकेच्या ताब्यात येण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे मिळकत व्यवस्थापक बी. यू. मोरे यांनी सांगितले.
दीड वर्षात बांधकाम
गंगापूर येथील जागा पालिकेच्या ताब्यात आल्यानंतर दीड वर्षात १८ दशलक्ष लिटर्स क्षमतेच्या केंद्राचे बांधकाम पूर्ण होईल. त्यानंतर २०२६ मध्ये आणखी १८ दशलक्ष लिटर्स क्षमतेच्या केंद्राचे बांधकाम सुरू होईल. पिंपळगाव बसवंत येथे पहिल्या टप्प्यात ३२ दशलक्ष लिटर्स क्षमतेचे तर पंधरा वर्षांनी आणखी तितक्याच क्षमतेचे बांधकाम पूर्ण होणार आहे.
- उत्तम पवार, अधीक्षक अभियंता, भुयारी गटार योजना

Web Title: Gangapur STP's hearing concludes: Hundreds of crores deposits from the corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.