गंगापूररोडला वृद्धेची सोनसाखळी खेचली

By Admin | Updated: August 27, 2016 00:20 IST2016-08-27T00:20:30+5:302016-08-27T00:20:44+5:30

गंगापूररोडला वृद्धेची सोनसाखळी खेचली

Gangapur rode to the old lady's son | गंगापूररोडला वृद्धेची सोनसाखळी खेचली

गंगापूररोडला वृद्धेची सोनसाखळी खेचली

नाशिक : देवदर्शनासाठी जाणाऱ्या वृद्धेच्या गळ्यातील सोनसाखळी दुचाकीवर आलेल्या संशयितांनी खेचून नेल्याची घटना शुक्रवारी (दि़२६) सकाळच्या सुमारास आकाशवाणी केंद्राजवळ घडली़ या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
गंगापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गंगापूररोडवरील उदयनगरमध्ये राहणाऱ्या पुष्पाबाई बळवंत वाणी या सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास आकाशवाणी केंद्राजवळील तुळजाभवानी मंदिरात देवदर्शनासाठी गेल्या होत्या़ मंदिरातून घरी पायी जात असताना बागुल हॉस्पिटलसमोर दुचाकीवर आलेल्या दोघा संशयितांनी त्यांच्या गळ्यातील दोन तोळे वजनाची सोन्याची पोत खेचून नेली़
शहरात सोनसाखळी चोरीच्या घटना सुरूच असून, त्यांनी वृद्ध महिलांना टारगेट केले आहे़ यामुळे महिलावर्गात घबराट पसरली असून, या सोनसाखळी चोरट्यांच्या बंदोबस्त करण्याची मागणी केली जाते आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Gangapur rode to the old lady's son