गंगापूर धरण ६९ टक्के
By Admin | Updated: September 21, 2015 23:30 IST2015-09-21T23:30:03+5:302015-09-21T23:30:45+5:30
सलग चौथ्या दिवशी पावसाची हजेरी

गंगापूर धरण ६९ टक्के
नाशिक : गेल्या शुक्रवारपासून हजेरी लावणाऱ्या पावसाने काल (दि.२१) सोमवारी सलग चौथ्या दिवशी हजेरी लावली. रविवारी शहर व परिसरात तसेच जिल्ह्यातील काही तालुक्यांत पावसाने जोरदार हजेरी लावली.
दरम्यान, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होऊन गंगापूरचा पाणीसाठा ६९ टक्के झाला आहे. सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात १२३ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. तालुकानिहाय मिलिमीटरमध्ये पावसाची नोेंद पुढीलप्रमाणे- नाशिक- १३.४, इगतपुरी-४६, दिंडोरी-११, पेठ-१०.२, त्र्यंबकेश्वर-३, मालेगाव-२, नांदगाव-००, चांदवड-२.८, कळवण-१३, बागलाण-५, सुरगाणा-३.५, देवळा-२, निफाड-६.४, सिन्नर-५, येवला-०० अशा एकूण १२३.३ मिलिमीटर पावसाची नोेंद जिल्ह्यात करण्यात आली आहे.
शुक्रवारी पहाटे तीनपासून सुरू झालेल्या पावसाने सलग १८ तास दमदार हजेरी लावल्याने जिल्ह्यातील सर्वच ठिकाणचा गंभीर होत चाललेला पाणीटंचाईचा प्रश्न काहीसा कमी झाला आहे.