गंगापूर धरण @ ६३ टक्के

By Admin | Updated: July 14, 2016 00:51 IST2016-07-14T00:46:17+5:302016-07-14T00:51:26+5:30

गंगापूर धरण @ ६३ टक्के

Gangapur dam @ 63 percent | गंगापूर धरण @ ६३ टक्के

गंगापूर धरण @ ६३ टक्के

नाशिक : गंगापूर धरणाच्या जलसाठ्यात बुधवारी (दि.१३) चार टक्क्यांनी वाढ झाली. सध्या धरणात तीन हजार ५८२ दलघफू पाणीसाठा असून, धरण ६३.६२ टक्के भरले आहे.
गंगापूर धरण क्षेत्रात दिवसभरात केवळ पाच मिलिमीटर पाऊस पडला. मंगळवारी संध्याकाळपर्यंत धरणाचा जलसाठा ५९ टक्के होता. चोवीस तासांत धरणाच्या जलसाठ्यात चार टक्क्यांनी वाढ झाली असून, धरणात सध्या तीन हजार ५८२ दलघफू इतका जलसाठा आहे. मराठवाड्याला दुष्काळाच्या स्थितीत गंगापूर धरणातून पाण्याचा करण्यात आलेला विसर्ग आणि त्याचवेळी कुंभपर्वणीसाठी धरणातून नदीपात्रात सोडावे लागलेले पाणी यामुळे नाशिककरांवर पाणीकपातीचे संकट ओढवले होते. अल्प जलसाठ्याने धरणाचा तळ गाठला होता. मंगळवारी (दि.१२) संध्याकाळी धरणात तीन हजार ३४९ दलघफू इतका जलसाठा होता. एकूणच धरणाची वाढती जलपातळी नाशिककरांना समाधान देणारी आहे. गेल्या शनिवारी पहाटेपासून तर रविवारी सहा वाजेपर्यंत गंगापूर धरण अवघे २३ टक्के भरले होते; मात्र रविवारी संध्याकाळपर्यंत धरणाची जलपातळी ३८ टक्क्यांवर पोहोचली.

Web Title: Gangapur dam @ 63 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.