शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

गंगाघाटाला पुन्हा अतिक्रमणाचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2019 12:12 AM

मनपाचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी काही दिवसांपूर्वी मनपा अधिकाऱ्यांसमवेत संपूर्ण गंगाघाट परिसरात स्मार्ट सिटी अंतर्गत केल्या जाणाºया कामांच्या नियोजनाबाबत पाहणी करत परिसरातील रस्त्यांवर विविध व्यावसायिक तसेच फळविक्रेत्यांच्या अतिक्रमणामुळे परिसर बकाल होत असल्याने तत्काळ अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले होते. मात्र अतिक्रमण विभागाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने अतिक्रमण कमी होण्याऐवजी वाढले आहे.

पंचवटी : मनपाचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी काही दिवसांपूर्वी मनपा अधिकाऱ्यांसमवेत संपूर्ण गंगाघाट परिसरात स्मार्ट सिटी अंतर्गत केल्या जाणाºया कामांच्या नियोजनाबाबत पाहणी करत परिसरातील रस्त्यांवर विविध व्यावसायिक तसेच फळविक्रेत्यांच्या अतिक्रमणामुळे परिसर बकाल होत असल्याने तत्काळ अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले होते. मात्र अतिक्रमण विभागाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने अतिक्रमण कमी होण्याऐवजी वाढले आहे.स्मार्ट सिटी कामांच्या पाहणीसाठी आयुक्त गमे यांनी अनेकदा गंगाघाट परिसरात पाहणी दौरा केला असून, या पाहणी दौºयादरम्यान गंगाघाटावर दुतोंड्या मारुतीनजीक असलेल्या फळविक्रेत्यांचे अतिक्रमण तसेच गंगाघाटावरील असलेले विविध विक्रेत्यांचे अतिक्रमण तत्काळ हटविण्याबाबत संबंधित अतिक्रमण विभाग अधिकारी व कर्मचाऱ्यांना आदेश दिले होते. शिवाय सदरचे अतिक्रमण हटविण्याच्या कामाला विलंब केला, तर संबंधित अधिकाºयांवर कारवाईचे संकेत दिलेले होते. त्यानुसार नव्याचे नऊ दिवस या उक्तीप्रमाणे सुरुवातीला काहीकाळ परिसरातील अतिक्रमण हटविण्याचे काम केले गेले, परंतु त्यानंतर आता परिस्थिती ‘जैसे थे’ झाली असून, अतिक्रमणामुळे भाविकांना पायी चालणेदेखील मुश्किल झाले आहे. अनेक विक्रेत्यांनी जागांवर आपला मालकी हक्क सांगण्यास सुरुवात केली असून, या जागांवरून बºयाचदा विक्रेत्यांमध्येच वादही झडत आहेत. मात्र महापालिकेने याकडे पूर्णत: दुर्लक्ष केले आहे.

टॅग्स :godavariगोदावरीEnchroachmentअतिक्रमण