गंगाकाठचा बाजार : जागा अपुरी असल्याने भाजीविक्रेत्यांचा स्थलांतरास विरोध
By Admin | Updated: December 28, 2015 23:31 IST2015-12-28T23:28:47+5:302015-12-28T23:31:23+5:30
गंगाकाठचा बाजार : जागा अपुरी असल्याने भाजीविक्रेत्यांचा स्थलांतरास विरोध

गंगाकाठचा बाजार : जागा अपुरी असल्याने भाजीविक्रेत्यांचा स्थलांतरास विरोध
पंचवटी : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कालावधीत मनपा प्रशासनाने हटविलेला भाजीबाजार पुन्हा वसविण्याचे प्रयत्न लोकप्रतिनिधी, तसेच भाजीविक्रेत्यांनी केला असला तरी प्रशासनाने मात्र हा प्रयत्न हाणून पाडला आहे. त्याउलट गणेशवाडीतील पाच एकर जागेत नव्याने भाजीबाजार वसविण्याची तयारी सुरू केली आहे. गणेशवाडीत महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून भाजी मंडई उभारलेली आहे, परंतु त्यास या विक्रेत्यांनी विरोध केला आहे.