गंगा-गोदावरी आरतीला अखेर मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2019 12:31 AM2019-09-01T00:31:44+5:302019-09-01T00:32:36+5:30

बनारस, हरिद्वार तसेच काशी येथे होणाऱ्या गंगा आरती प्रमाणे आता नाशिकला ही भव्यदिव्य स्वरूपात गंगा आरतीचा मुहूर्त लागला आहे. येत्या ९ सप्टेंबरपासून रामकुंड येथे दैनंदिन भव्य दिव्य अशा स्वरूपात गंगा आरती केली जाणार

 Ganga-Godavari is finally Muhurt | गंगा-गोदावरी आरतीला अखेर मुहूर्त

गंगा-गोदावरी आरतीला अखेर मुहूर्त

googlenewsNext

पंचवटी : बनारस, हरिद्वार तसेच काशी येथे होणाऱ्या गंगा आरती प्रमाणे आता नाशिकला ही भव्यदिव्य स्वरूपात गंगा आरतीचा मुहूर्त लागला आहे. येत्या ९ सप्टेंबरपासून रामकुंड येथे दैनंदिन भव्य दिव्य अशा स्वरूपात गंगा आरती केली जाणार असून, यासाठी शासनाने मान्यता व त्यासाठी निधीही मंजूर केला आहे. या संदर्भात रूपरेषा ठरविण्यासाठी पुरोहित संघ, धार्मिक संघटनांची संयुक्त बैठक घेण्यात आली.
गेल्या अनेक वर्षांपासून बनारस, हरिद्वार, काशीच्या धर्तीवर दक्षिणेची गंगा म्हणून ओळखल्या जाणाºया गोदावरीचीही दररोज आरती केली जावी अशी मागणी केली जात होती. नाशिकचे धार्मिक महत्त्व लक्षात घेता पर्यटन वाढीसाठी गोदावरीची दररोज आरती केल्यास त्याचा लाभ होईल अशी बाजू पर्यटन विकास महामंडळाकडे मांडण्यत आली. शासनाने त्याला तत्त्वता मान्यताही दिली असल्याने काही वर्षापूर्वी नाशिक महापालिकेच्या पुढाकाराने काही महिने गंगा आरती सुरू करण्यात आली होती.
गुरुवारी दुपारी पुरोहित संघाच्या कार्यालयात सतीश शुक्ल, आमदार बाळासाहेब सानप, पोलिस निरीक्षक कैलास पाटील आणि पुरोहित संघ यांच्यात बैठक होऊन त्यात आमदार सानप यांनी बनारसच्या धर्तीवर आता नाशिकलादेखील भव्य स्वरूपात गंगा आरती होणार असून, शासनाने मान्यता देत निधी मंजूर केला असल्याचे सांगितले. पुरोहित संघाकडून गेल्या साथ ६० वर्षांपासून गंगा आरती सुरू असून, आता बनारस धर्तीवर गंगाआरती होणार असल्याने आरतीचे स्वरूप बदलणार आहे. या आरतीच्या शुभारंभाच्या निमित्ताने ९ सप्टेंबर रोजी दुपारी सरदार चौक येथून शोभायात्रा काढण्यात येणार असून, त्यानंतर गोदेच्या किनारी रामकुंडावर गंगा आरती होणार आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दरम्यान गंगा आरतीला महत्त्व प्राप्त झाले होते. त्यानंतर मात्र ही आरती बंद पडली. पुन्हा ही मागणी धरू लागल्याने शासनाने अखेर या मागणीची दखल घेत गोदावरी आरती करण्यास मंजुरी देण्यात आली असून, येत्या ९ सप्टेंबरपासून दररोज सायंकाळी आरती करण्यात येणार आहे.

Web Title:  Ganga-Godavari is finally Muhurt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.