शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

भगूरला वाहतेय विकासाची गंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 13:00 IST

भगूर शहरात विकासाची गंगा वाहत असली तरी काही समस्या गावाला भेडसावत आहेत. त्यामध्ये भगूर नगरपालिकेचा दवाखाना बंद झाला आहे.

विलास भालेराव

भगूर शहरात विकासाची गंगा वाहत असली तरी काही समस्या गावाला भेडसावत आहेत. त्यामध्ये भगूर नगरपालिकेचा दवाखाना बंद झाला आहे. त्यामुळे स्वाइन फ्लू, डेंग्यूसारखे आजार गावात मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यासाठी ग्रामीण रुग्णालय होणे गरजेचे आहे. जनतेकडून अग्निशमन कर रूपाने गोळा केला जातो. अग्निशमन गाडी विकत घेतली. मात्र प्रशिक्षित कर्मचारी नसल्याने अग्निशमन यंत्रणा ठप्प झालेली आहे. दुसऱ्याच्या भरवशावर आग विझवायची वेळ भगूरकरांवर आहे. भगूर शहरात कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन करण्याचा प्रयत्न झाला. परंतु त्यांना सोयी-सुविधा मिळाली नाही. तरी कृषी उत्पन्न बाजार समिती येणे गरजेचे आहे. भगूरला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्मारक आहे. पालिकेने, राजकीय नेत्यांनी पाठपुरावा करून ते राष्टÑीय स्मारक करणे गरजेचे असून, त्यामुळे पर्यटकांची संख्या वाढेल. येत्या दशकात भगूर शहरात मोठ्या प्रमाणात विकासगंगा वाहणार असून, शहराचा कायापालट होत आहे. भगूरला तालुक्याचा दर्जाही मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु भगूरचे मूळ व्यापारी, व्यावसायिक, नोकरी करणारे नावलौकिक बरेचशे नागरी कुटुंबे नाशिकरोड, जेलरोड, देवळाली कॅम्प आणि विशेषत: विजयनगर परिसरात कायमस्वरूपी राहाण्यास गेल्याने केवळ मुत्सदी, बलाढ्य राजकारणी नेत्यांनी भगूर नगरपालिकेचे अस्तित्व अबाधित ठेवून भगूरच्या वैभवात भर घालीत आहेत.१०० वर्षांपूर्वी चार गल्ल्यांचे आणि २ ते ३ हजार लोकवस्तीचे गाव असलेल्या भगूर गावाला विकासाचा खरा आकार सन १९२५ मध्ये भगूर नगरपालिका स्थापन झाल्यावर आला. जसजशी भगूरची लोकसंख्या वाढत गेली तसा गावाचा विकास होत गेला. हळूहळू झोपड्या जाऊन कौलारू घरे आली. त्यानंतर सिमेंट, पत्र्याची वसाहती निर्माण होऊन चार गल्ल्यांच्या गावाचे आता १७ प्रभाग होऊन भगूर नगरपालिकेत विकासासाठी आपला वॉर्डाचा प्रभागाचा हक्काचा नगरसेवक असे १७ नगरसेवक शहराच्या विकासाचा विचार करू लागले. आता भगूर शहर हे संपूर्ण काँक्रीटीकरण झाले. एकेकाळी पिण्याच्या पाण्यासाठी भगूरचा नगराध्यक्षांना मोर्चाद्वारे बांगड्याचा आहेर देणाºया महिलांना मुबलक पाणी मिळते आहे, तर बहुतांश अत्यावश्यक सुविधा नागरिकांना मिळत असल्याने काहीसा विकास झाल्याचे वाटत आहे.तरीपण येत्या २०२० ते ३० या दशकात नाशिकरोड, देवळाली कॅम्प आणि परिसरातील गावामध्ये भगूरचा गावाचा आकर्षक विकास होण्याच्या मार्गावर असून, भगूरमध्ये मोठमोठे रोजगार निर्माण होऊन झोपडपट्टी मुक्त भगूर शहर नावारूपाला येऊन भगूर बाहेर गेलेले नागरिक, व्यापारी येत्या दशकात पुन्हा आपल्या भगूर नगरीत राहाण्यास येण्याची परिस्थिती निर्माण होत आहे. भगूरच्या दळणवळण विकासाला हातभार लागला तो म्हणजे नुकताच नव्याने १५ कोटींचा भगूर रेल्वेगेट क्रॉसिंग उड्डाणपूल आणि चार कोटींचा जुना रेल्वे मोरी पूल यामुळे भगूरकरांचे दळण-वळण सुविधा वाढेल. शिवाय इतर गावांतील नागरिक खरेदी-विक्रीसाठी याच सुसज्ज मार्गाने येण्यास पसंत करतील आणि इगतपुरी, सिन्नर, नाशिक या तीन तालुक्याचे व्यापारी केंद्र म्हणून भगूर शहरात सुरुवात होणार आहे. यापूर्वी १५ खेड्यातील नागरिक भगूरमध्ये येत होते. परंतु रस्ते इतर सुविधांमुळे दुरावत चालले होते. परंतु त्यांना निश्चित दिशा मिळून वाटचाल सुरू होत आहे. तसेच भगूर नगरपालिकेच्या वतीने व्यापाऱ्यांसाठी चार कोटी रुपयांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर डेली मार्केटच्या कामाला नुकतीच सुरूवात झाली आहे. २ ते ३ वर्षात छानपैकी होणार आहे. त्यामुळे परिसरातील विविध खेड्यातील शेतकरी येथे शेतीमाल विक्रीसाठी घेऊन येणार. तसेच खरेदीसाठी इतर गावातील नागरिक निश्चित येणार त्यामुळे भाजी मार्केट समस्या संपणार त्याचा भगूर विकासाला हातभार लागणार. गेल्या चार-पाच वर्षापासून भगूरला स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर उद्यानाचे ५ ते ६ कोटीचे काम चालू आहे. जसजसे शासनाचे अनुदान येत राहील तसे त्यांचे काम पूर्णत्वास येईल म्हणजे भविष्यात हे सावरकर उद्यान पर्यटकांसाठी खुले राहील त्यामुळे वैभवात भर पडेलच.

टॅग्स :Nashikनाशिक