शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

पाथर्डी फाट्यावर टोळक्याकडून तरुणास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 01:23 IST

मित्राचा पत्ता न सांगितल्याचा राग आलेल्या चौघा संशयितांनी एका तरुणास चाकू व दगडाने मारहाण करून जखमी केल्याची घटना पाथर्डी फाट्यावरील रिक्षा स्टॅण्डवर घडली.

नाशिक : मित्राचा पत्ता न सांगितल्याचा राग आलेल्या चौघा संशयितांनी एका तरुणास चाकू व दगडाने मारहाण करून जखमी केल्याची घटना पाथर्डी फाट्यावरील रिक्षा स्टॅण्डवर घडली.ज्ञानेश्वर कापसे (२६, लेखानगर, सिडको) या तरुणाने अंबड पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार गुरुवारी (दि़२७) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास तो पाथर्डी फाट्यावरील रिक्षा स्टॅण्डवर उभा होता़ यावेळी संशयित दीपक भारूडकर हा आपल्या तीन साथीदारांसह आला़ त्यानेमायकल कुठे आहे, अशी विचारणा केली असता कापसे यानेसांगता येणार नाही, असे सांगितले़ याचा राग येऊन संशयितांनी चाकू व दगडाने जबर मारहाण केली़यामध्ये जखमी झालेल्या कापसेवर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत़पोलीस कॅन्टीनसमोरूनदुचाकीची चोरीसुचितानगरमधील रहिवासी मधुकर शार्दुल (५६, रा़ फ्लॅट नंबर ७, रविराज रेसिडेन्सी) यांनी आपली २५ हजार रुपये किमतीची काळ्यारंगाची हिरो होंडा दुचाकी (एमएच १५, सीएल ०४७७) सीबीएसजवळील सद्भावना पोलीस कॅन्टींगसमोरपार्क केली होती़ सोमवारी(दि़२४) रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास चोरट्यांनी ही दुचाकी चोरून नेली़या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़नाईक महाविद्यालयातूनदुचाकीची चोरीगंगापूर रोडवरील आकाशवाणी टॉवर परिसरातील रहिवासी सुभाष निघुते (४४, रा़ तिरुपती टॉवर) यांनी आपली २० हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची हिरो होंडा दुचाकी (एमएच १७, एआर १६८९) व्ही़ एऩ नाईक महाविद्यालयाच्या पार्किंगमध्ये पार्क केली होती़ शुक्रवारी (दि़२८) सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास चोरट्यांनी ही दुचाकी चोरून नेली़तरुणाचा मोबाइल लंपास४भद्रकालीतील कोकणीपुरा येथील रहिवासी अकबर शेख (२२) या तरुणाच्या खिशातील ९ हजार रुपये किमतीचा पांढऱ्या रंगाचा मोबाइल जय मल्हार वडापाव सेंटरजवळून चोरट्यांनी चोरून नेला़ या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़अल्पवयीनमुलीचे अपहरणराजीवनगर परिसरातील अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आल्याची घटना शनिवारी (दि़२९) सायंकाळच्या सुमारास घडली़ अपहृत मुलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सायंकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास मुलगी घराबाहेर पडली ती परतलीच नाही़ तिचा इतरत्र शोध घेऊनही न सापडल्याने अखेर इंदिरानगर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला़

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी