दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2019 01:35 AM2019-09-03T01:35:42+5:302019-09-03T01:36:08+5:30

गंगाघाट परिसरात दरोड्याच्या इराद्याने फिरणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून शस्त्रे हस्तगत करण्यात आली.

 The gang in preparation for the robbery | दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद

दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद

Next

पंचवटी : गंगाघाट परिसरात दरोड्याच्या इराद्याने फिरणाऱ्या टोळीला पोलिसांनीअटक केली असून, त्यांच्याकडून शस्त्रे हस्तगत करण्यात आली.
रविवारी (दि.१) रात्री नऊ वाजेच्या सुमारास सहायक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे हे गुन्हे शोध पथकासह गस्तीवर होते. यावेळी म्हसोबा महाराज पटांगणावर एक रिक्षा संशयास्पदरीत्या उभी असल्याचे आढळले असता त्यांनी वाहन रिक्षाजवळ नेले असता रिक्षामधून संशयितांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलीसांनी त्यांना ताब्यात घेतले. सर्व संशयित वडाळागावातील असल्याचे आढळून आले. मनपाच्या घरकुल प्रकल्पात राहणारे संशयित आरोपी याकुब गुलाब मदारी, हबीब हनीफ शहा, जाकिर बशीर शहा, जावेद पिरन शहा, मोहसिन ऊर्फ शेरू कालू खान यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्या रिक्षाची (एमएच १५, एके ६४३२) झडती घेतली असता रिक्षात धारदार शस्त्रे आढळून आली. त्यांनी दरोडा टाकण्याच्या इराद्याने दबा धरून बसल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title:  The gang in preparation for the robbery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.