बसचालकावर टोळक्याचा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:19 IST2020-12-30T04:19:32+5:302020-12-30T04:19:32+5:30
या प्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित नवनीत मिथिलेश पटेल (२२), सचिन ज्ञानेश्वर निकम (दोघे, रा.शिवकृपानगर, हिरावाडी), अंगत दत्तात्रेय ...

बसचालकावर टोळक्याचा हल्ला
या प्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित नवनीत मिथिलेश पटेल (२२), सचिन ज्ञानेश्वर निकम (दोघे, रा.शिवकृपानगर, हिरावाडी), अंगत दत्तात्रेय देवरे (२६ रा.आयोध्यानगरी, साईनगर), वैभव राजेंद्र कर्डक (२९ रा.साईनगर, अमृतधाम) या संशयितांच्या टोळक्याने बसचालक शिंदे यांना मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
रविवारी (दि.२७) सायंकाळी ते नाशिक-जळगाव (एमएच ४० एन ९८३२) या बसवर सेवा बजावत असताना ही घटना घडली. प्रवाशांना घेऊन ते जळगावच्या दिशेने जात असताना, महामार्गावरील अमृतधाम चौफुली भागात समांतर रस्त्यावर दुचाकीस्वार संशयित टोळक्याने त्यांच्या दुचाकींनी बस अडविली. यावेळी संतप्त टोळक्याने ‘तू बस कोठेही उभी करतो का?’ असा जाब विचारत चालक शिंदे यांना कॅबिनमधून बाहेर ओढून भररस्त्यात लाथाबुक्यांनी मारहाण केली. यावेळी संशयितांनी पुन्हा या रस्त्यावर दिसला, तर तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी पुढील तपास पंचवटी पोलीस करीत आहेत.