शासन नियमानुसार गणेशोत्सव साजरा करावा: सचिन पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:18 IST2021-09-07T04:18:49+5:302021-09-07T04:18:49+5:30

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर येथील पोलीस नियंत्रण कक्ष आवारातील सुसंवाद सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या गणेशोत्सव समिती, शांतता व एकात्मता समितीच्या ...

Ganeshotsav should be celebrated as per government rules: Sachin Patil | शासन नियमानुसार गणेशोत्सव साजरा करावा: सचिन पाटील

शासन नियमानुसार गणेशोत्सव साजरा करावा: सचिन पाटील

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर येथील पोलीस नियंत्रण कक्ष आवारातील सुसंवाद सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या गणेशोत्सव समिती, शांतता व एकात्मता समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत पाटील बोलत होते. व्यासपीठावर अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, पोलीस उपअधीक्षक लता दोंदे, महापालिकेचे सहायक आयुक्त अनिल पारखे,अग्निशमन दलाचे संजय पवार, गणेश उत्सव समितीचे अध्यक्ष केवळ हिरे आदी उपस्थित होते. यावेळी पाटील पुढे म्हणाले की, मालेगाव शहरातील नागरिकांनी कायमच पोलीस प्रशासनाला सहकार्य केले आहे. यापुढेही शहराची शांतता कायम ठेवा. अडचणीतून मार्ग काढण्यात येईल. बैठकीत गणेश उत्सव समितीच्या व शांतता समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अडचणी मांडल्या. या अडचणींची दखल घेऊन मंगळवारी पुन्हा महापालिका आयुक्त भालचंद्र गोसावी यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात येईल असेही पाटील यांनी सांगितले. यावेळी गणेश उत्सव समितीचे केवळ हिरे प्रमोद शुक्ला, रामा मीस्तरी, ॲड. हिदायत उल्हा यांची भाषणे झाली. बैठकीला गणेश उत्सव समितीचे पदाधिकारी शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते.

Web Title: Ganeshotsav should be celebrated as per government rules: Sachin Patil