चतुर्थी असूनही गणेश मंदिरे सुनीसुनी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2020 12:57 AM2020-07-09T00:57:09+5:302020-07-09T00:57:35+5:30

संकष्टी चतुर्थीच्या दिवशी महानगरातील मंदिरांबाहेर दरवेळी लागणाऱ्या रांगा आणि भाविकांची गर्दी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अजिबात नव्हती.

Ganesha temples sunisuni despite Chaturthi! | चतुर्थी असूनही गणेश मंदिरे सुनीसुनी!

चतुर्थी असूनही गणेश मंदिरे सुनीसुनी!

googlenewsNext

नाशिक : संकष्टी चतुर्थीच्या दिवशी महानगरातील मंदिरांबाहेर दरवेळी लागणाऱ्या रांगा आणि भाविकांची गर्दी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अजिबात नव्हती.
कोरोनामुळे मंदिरे उघडण्यास अद्यापही परवानगी मिळालेली नाही. तसेच कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नागरिकदेखील घराबाहेर पडणे टाळत असल्याने मंदिरांबाहेर रांगा दिसल्या नाही. जे नागरिक अन्य कोणत्याही कारणास्तव घराबाहेर पडले आहेत, असे नागरिक केवळ मंदिराबाहेर क्षणभर उभे राहून नमस्कार करीत मार्गस्थ होताना दिसून येत आहेत.

Web Title: Ganesha temples sunisuni despite Chaturthi!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.