शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! राष्ट्रवादीतील पक्षप्रवेशाचा हायव्हॉल्टेज ड्रामा; "मला टॉर्चर केले गेले, अन्..."
2
महापुरुषांचा अपमान करणाऱ्या नेत्यांची यादीच वाचली; जितेंद्र आव्हाडांनी भाजपाला सुनावलं
3
"कंगनाकडे राणी लक्ष्मीबाईसारखे शौर्य आणि...", योगी आदित्यनाथांनी उधळली स्तुतीसुमने
4
"महात्मा गांधींबाबत माहित नाही, मग त्यांना राज्यघटनेबाबतही…’’, मल्लिकार्जुन खर्गेंचा नरेंद्र मोदींवर संताप
5
"हा उद्योग केल्यावर दोन दिवस झोप लागली नाही"; रक्ताचे नमुने बदलणाऱ्या डॉक्टरने दिली कबुली
6
सरकार स्थापन होताच 25 दिवस खास तरुणांसाठी! अखेरच्या रॅलीत काय-काय बोलले पंतप्रधान मोदी?
7
महाराष्ट्रात निकाल काय? Lokniti-CSDS च्या विश्लेषकांची भविष्यवाणी; महायुतीला धक्का
8
"नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा घालवली...", मनमोहन सिंग यांची पत्रातून टीका
9
दोन मुलांच्या मृत्यूची जबाबदारी ड्रायव्हरच घेईल; ब्रिजभूषण यांची उडवाउडवीची उत्तरे
10
जम्मूमध्ये पोलीस ठाण्यावर हल्ला; लष्कराच्या १६ जवानांवर गुन्हा दाखल
11
आरोग्य सांभाळा! 'या' लोकांसाठी AC ठरू शकतो घातक; फुफ्फुसांचं होईल मोठं नुकसान
12
आमचे येथे श्रीकृपेकरून... अनंत अंबानींचं शुभमंगल 'आमची मुंबई'तच; 'असा' आहे तीन दिवसांचा सोहळा 
13
"देशात इंडिया आघाडीची त्सुनामी, वाराणसीत नरेंद्र मोदी पराभूत होणार’’ मोदींविरोधात निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेस नेत्याचा दावा
14
"जितेंद्र आव्हाड मनोविकृत, त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा", मंत्री गुलाबराव पाटलांची मागणी
15
OYO ला आर्थिक वर्ष २४ मध्ये १०० कोटींचा निव्वळ नफा; पहिल्यांदाच नफ्यात आली कंपनी
16
"होय, मी संन्यास घ्यायला तयार"; अजित पवारांची अट अंजली दमानियांकडून मान्य, पण...
17
“PM मोदींनी महात्मा गांधींबाबत केलेले विधान म्हणजे देशाचे दुर्दैव”; पृथ्वीराज चव्हाणांची टीका
18
अरे देवा! नवऱ्याने रील बनवण्यास केली मनाई; नाराज झालेली बायको मुलीसह झाली फरार
19
Gautam Gambhir च्या विरोधात 'दादा'? गांगुलीचा BCCI ला सल्ला अन् चाहते बुचकळ्यात!
20
TATA चा 'हा' शेअर विकून बाहेर पडतायत गुंतवणूकदार; एक्सपर्ट म्हणाले, "१३५ पर्यंत येणार..."

पिंपळगाव मोर येथे टाळ मृदुंगाच्या पारंपरिक तालात गणरायाला निरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2019 7:11 PM

इगतपुरी तालुक्यातील विविध भागात गणरायाला भावपूर्ण निरोप देऊन विसर्जन करण्यात आले.

घोटी (नाशिक) - इगतपुरी तालुक्यातील विविध भागात गणरायाला भावपूर्ण निरोप देऊन विसर्जन करण्यात आले. सकाळपासून विविध मंडळांनी नियोजित वेळेत जवळ असणाऱ्या नदी, धरणे ह्या ठिकाणी बाप्पाला विसर्जित केले. तालुक्यातील पिंपळगाव मोर येथे गेल्या अकरा दिवसापासून विराजमान झालेल्या बाप्पाला आज साश्रुनयनांनी निरोप देण्यात आला. विसर्जन शांततेत सुरू असून कुठलीही अनुचित घटना घडलेली नाही.

सालाबाद प्रमाणे बाप्पा विराजमान झाल्याने गणेशोत्सव काळात अत्यंत आनंद आणि मंगलमय वातावरण निर्माण झाले होते. लहान मुलांना तर पर्वणीच असते. पिंपळगाव मोरचे वैशिष्ठ्य म्हणजे टाळ मृदुंगाच्या तालात पारंपरिक पद्धतीने बाप्पाची गावातून मिरवणूक काढण्यात आली. ग्रामप्रदक्षिणा झाल्यानंतर दारणा नदीकाठी आरती व त्यांनतर विसर्जन करून प्रसाद वाटप करण्यात आला.गावातील भजनी मंडळी गणेशोत्सव काळात अकराही दिवस प्रत्येक घरगुती व मंडळाच्या गणपती समोर वारकरी भजन करून हरिनामाचा जागर करतात. प्रत्येक गणपतीसमोर भजन ठरलेले असते. मध्यरात्रीपर्यंत रोज भजनाचे कार्यक्रम होतात.भजनी मंडळींमध्ये शांताराम काळे, जगन्नाथ काळे, नामदेव काळे, चेतन शिंदे, रामदास माळी, दशरथ काळे, मधुकर बेंडकोळी, ज्ञानेश्वर डगळे, संजय कदम आदी भजनी मंडळीनी सहभाग घेतला. यात तरुण पिढीने देखील सहभाग नोंदवला. 

गणेशोत्सवात गणरायाची मिरवणूक टाळ मृदुंग आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात करण्यात येते. घरोघरी आरती नंतर ग्राम प्रदक्षिणा, नदीवर विसर्जन आणि नंतर प्रसाद वाटप असतो. यामध्ये प्रामुख्याने घरगुती व मंडळाचे गणपती असतात. गावात कोणत्याही प्रकारचे डॉल्बी, अथवा डीजेचा गणेशोत्सव मिरवणुकीसाठी वापर केला नाही.- निलेश काळे, पिंपळगाव मोर

टॅग्स :Nashikनाशिक