पिंपळगाव मोर येथे टाळ मृदुंगाच्या पारंपरिक तालात गणरायाला निरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2019 07:11 PM2019-09-12T19:11:36+5:302019-09-12T19:11:54+5:30

इगतपुरी तालुक्यातील विविध भागात गणरायाला भावपूर्ण निरोप देऊन विसर्जन करण्यात आले.

Ganesh Visarjan in Pimpalgaon Mor | पिंपळगाव मोर येथे टाळ मृदुंगाच्या पारंपरिक तालात गणरायाला निरोप

पिंपळगाव मोर येथे टाळ मृदुंगाच्या पारंपरिक तालात गणरायाला निरोप

Next

घोटी (नाशिक) - इगतपुरी तालुक्यातील विविध भागात गणरायाला भावपूर्ण निरोप देऊन विसर्जन करण्यात आले. सकाळपासून विविध मंडळांनी नियोजित वेळेत जवळ असणाऱ्या नदी, धरणे ह्या ठिकाणी बाप्पाला विसर्जित केले. तालुक्यातील पिंपळगाव मोर येथे गेल्या अकरा दिवसापासून विराजमान झालेल्या बाप्पाला आज साश्रुनयनांनी निरोप देण्यात आला. विसर्जन शांततेत सुरू असून कुठलीही अनुचित घटना घडलेली नाही.


सालाबाद प्रमाणे बाप्पा विराजमान झाल्याने गणेशोत्सव काळात अत्यंत आनंद आणि मंगलमय वातावरण निर्माण झाले होते. लहान मुलांना तर पर्वणीच असते. पिंपळगाव मोरचे वैशिष्ठ्य म्हणजे टाळ मृदुंगाच्या तालात पारंपरिक पद्धतीने बाप्पाची गावातून मिरवणूक काढण्यात आली. ग्रामप्रदक्षिणा झाल्यानंतर दारणा नदीकाठी आरती व त्यांनतर विसर्जन करून प्रसाद वाटप करण्यात आला.

गावातील भजनी मंडळी गणेशोत्सव काळात अकराही दिवस प्रत्येक घरगुती व मंडळाच्या गणपती समोर वारकरी भजन करून हरिनामाचा जागर करतात. प्रत्येक गणपतीसमोर भजन ठरलेले असते. मध्यरात्रीपर्यंत रोज भजनाचे कार्यक्रम होतात.भजनी मंडळींमध्ये शांताराम काळे, जगन्नाथ काळे, नामदेव काळे, चेतन शिंदे, रामदास माळी, दशरथ काळे, मधुकर बेंडकोळी, ज्ञानेश्वर डगळे, संजय कदम आदी भजनी मंडळीनी सहभाग घेतला. यात तरुण पिढीने देखील सहभाग नोंदवला. 

गणेशोत्सवात गणरायाची मिरवणूक टाळ मृदुंग आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात करण्यात येते. घरोघरी आरती नंतर ग्राम प्रदक्षिणा, नदीवर विसर्जन आणि नंतर प्रसाद वाटप असतो. यामध्ये प्रामुख्याने घरगुती व मंडळाचे गणपती असतात. गावात कोणत्याही प्रकारचे डॉल्बी, अथवा डीजेचा गणेशोत्सव मिरवणुकीसाठी वापर केला नाही.
- निलेश काळे, पिंपळगाव मोर

Web Title: Ganesh Visarjan in Pimpalgaon Mor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक