गणेशोत्सव आरास स्पर्धेचे बक्षीस वितरण
By Admin | Updated: October 2, 2015 23:43 IST2015-10-02T23:41:41+5:302015-10-02T23:43:48+5:30
गणेशोत्सव आरास स्पर्धेचे बक्षीस वितरण

गणेशोत्सव आरास स्पर्धेचे बक्षीस वितरण
नाशिकरोड : शिवसेनाप्रणित युवा सेनेतर्फे घरगुती गणेशोत्सव आरास स्पर्धेतील बक्षीस वितरण करण्यात आले. अध्यक्षस्थानी दत्ता गायकवाड होते.
प्रमुख पाहुणे म्हणून राजु लवटे, शिवाजी भोर, संजय तुंगार, कुमार गायकवाड, योगेश बेलदार, नितीन चिडे, दिलीप शिरसाठ, योगेश देशमुख, रूपेश पालकर, वैभव ठाकरे, शिवानंद मुठाळ, वामन भोर, योगेश भोर, मसुद जिलानी, अंकुश काकड, संदेश लवटे आदि मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेतील प्रथम पारितोषिक - माधुरी देशपांडे, द्वितीय - गोरख व्यवहारे, तृतीय - सिद्धांता पडवळ, चतुर्थ - शिवा उगले व उत्तेजनार्थ दहा बक्षिसे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आली. प्रास्ताविक समर्थ मुठाळ यांनी केले. सूत्रसंचलन विक्रम खरोटे व आभार आकाश काळे यांनी मानले. यावेळी बंटी मोरे, विजय अमृते, आनंद अमृते, प्रकाश कोरडे, सोहेल सय्यद, नीलेश शिरसाठ, स्वप्नील लवटे, पंकज मुठाळ, सौरभ पवार, अमित गांगुर्डे, रूपेश थोरात, राजू बोराडे उपस्थित होते. (प्रतिनिधी)नाशिकरोड युवा सेनेतर्फे घरगुती गणेशोत्सव आरास स्पर्धेतील प्रथम पारितोषिक माधुरी देशपांडे यांना देताना दत्ता गायकवाड. समवेत शिवाजी भोर, राजू लवटे, समर्थ मुठाळ, योगेश देशमुख, विक्रम खरोटे आदि.