शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
4
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
5
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
6
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
7
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
8
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
9
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
10
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
11
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
12
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
13
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
14
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
15
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
16
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
19
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
20
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या

गणेश मंडळांचा पंचवटीत पौराणिक देखाव्यांवर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 12:27 AM

पंचवटीत यंदाही गणेश मंडळांनी पौराणिक तसेच धार्मिक देखावे भाविकांसमोर साकारले आहेत. यंदाच्या वर्षी जवळपास ८० हून अधिक छोट्या- मोठ्या मित्रमंडळांनी प्रशासनाकडे परवानगी घेतली आहे.

पंचवटी : पंचवटीत यंदाही गणेश मंडळांनी पौराणिक तसेच धार्मिक देखावे भाविकांसमोर साकारले आहेत. यंदाच्या वर्षी जवळपास ८० हून अधिक छोट्या- मोठ्या मित्रमंडळांनी प्रशासनाकडे परवानगी घेतली आहे. सुमारे चाळीस ते पन्नास वर्षांहून अधिक वर्षे गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांनी यंदा आरास मांडल्या असून देखावे बघण्यासाठी भाविक गर्दी करत आहेत.  पंचवटी कारंजा येथील गुरुदत्त शैक्षणिक सामाजिक कला क्रीडा मंडळाचे यंदा ३७ वे वर्ष असून मंडळाने यंदा कुंभकर्णाचा वध देखावा साकारला आहे. राम कुंभकर्णाचा वध करत असताना ब्रह्मा, विष्णू प्रगट झालेले आहे त्यापाठोपाठ विविध देवदेवतांच्या मूर्ती देखाव्यात साकारल्या आहेत. शिवाजी चौकातील भगवती शैक्षणिक सामाजिक कला क्रीडा मंडळाने ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या मुखी वेद वदविले हा चलचित्रपर आधारित देखावा साकारला आहे.सेवाकुंज येथील आई सप्तशृंगी मित्रमंडळाने यंदा गणेशाची प्रतिष्ठापना करून सलग दहा दिवस भाविकांसाठी विविध मनोरंजनात्मक भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यात रांगोळी, संगीत खुर्ची, लहान मुलांसाठी डान्स, कॉमेडी शो, देशभक्तीपर गीते तसेच विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे. मालेगाव स्टॅन्ड मित्रमंडळाने ‘संत गोरा कुंभाराची भक्ती’ असा चलचित्रपर देखावा साकारला आहे. संत गोरा कुंभार भक्तीत तल्लीन होऊन चिखल तुडवित असताना त्यांच्या मुलालाही पायाखाली तुडवितात. मुलाचा चेंदामेंदा झाल्याचे पाहताच त्यांची पत्नी हंबरडा फोडते त्यावेळी साक्षात विठ्ठल प्रगट होतात असा देखावा साकारला आहे मंडळाचे ७५ वे वर्ष आहे. सरदार चौक मित्रमंडळाने यावर्षी भक्त प्रल्हादाची भक्ती नरसिंह अवतार असा चलचित्रपर देखावा साकारला आहे.

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवganpatiगणपती