शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सव झाला आॅनलाइन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 00:51 IST

गणेशोत्सव आला की घरोघरी उत्साहाचे वातावरण बघायला मिळते. सध्या आॅनलाइन खरेदीचा काळ असल्यामुळे गणेशोत्सव यातून मागे कसा राहील? यामुळे सध्या आॅनलाइन खरेदीच्या अ‍ॅपवर गणेशोत्सवासाठी विशिष्ट विभाग तयार झालेला दिसून येत आहे.

नाशिक : गणेशोत्सव आला की घरोघरी उत्साहाचे वातावरण बघायला मिळते. सध्या आॅनलाइन खरेदीचा काळ असल्यामुळे गणेशोत्सव यातून मागे कसा राहील? यामुळे सध्या आॅनलाइन खरेदीच्या अ‍ॅपवर गणेशोत्सवासाठी विशिष्ट विभाग तयार झालेला दिसून येत आहे. तसेच यांसारख्या अ‍ॅपवर गणेशोत्सवाच्या वस्तंूची खरेदी करताना दिसून येत आहे.गणपती उत्सव आला की खरेदीला बाजारात तुडुंब गर्दी होत असते. त्यात बाजारात येऊन पार्किंगची व्यवस्था नसते त्यामुळे पायी घरापासून बाजारात यावे लागत असल्यामुळे आता मात्र एका क्लिकवर आपण घरबसल्या ही सर्व खरेदी करू शकतो. आॅनलाइनवर गणेशोत्सवाचा स्वतंत्र्य विभाग सुरू झाला आहे. यामध्ये ग्राहकांना मखर, फ्लस्टिकचे फुले, सजावठीचे साहित्य, विद्युत रोषणाईच्या माळा यांची खरेदी मोठ्या प्रमाणावर ग्राहक करत आहे. आजकालची तरुणाई आॅनलाइन खरेदीला मोठ्या प्रमाणावर पसंती देत आहे.चायनीज साहित्याचीखरेदी घटलीविद्युत रोषणाईचे साहित्यांना या काळात मोठी मागणी असते. अनेक वर्षांपासून बाजारात चायनीज रोषणाईचे साहित्य मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होत होते. पण यावर्षी चायनीजच्या वस्तुंमध्ये मोठी घट झालेली बघायला मिळत आहे.सध्या रोषणाईच्या साहित्यांमध्ये भारतीय उत्पादन असलेल्या वस्तूंना मोठी मागणी मिळत आहे. अनेक वर्षांपासून बाजारात चायनीज वस्तूंचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले होते. पण नागरिकांमध्ये झालेली जनजागृती व अशा वस्तुंवर काही प्रमाणात टाकण्यात आलेल्या बहिष्कारामुळे या वस्तू भारतीय बाजारपेठेतून कमी होताना दिसून येत आहे. त्यामुळे ग्राहकांकडूनही अशा वस्तू खरेदी करण्याचे प्रमाण कमी झाले आहे.बाजारात खरेदीसाठी दरवर्षीप्रमाणे मोठी गर्दी बघायला मिळत होती. त्यामुळे बाजारात येऊन खरेदी करण्यास जमत नसल्यामुळे सहज आॅनलाइन साहित्य बघण्यास सुरुवात केली असता यावर गणेशोत्सवाचा स्वतंत्र विभाग दिसला. यामध्ये मला जवळपास सगळेच साहित्य उपलब्ध झाले. त्यामुळे गणेशोत्सवाची मूर्ती वगळता सर्वच खरेदी आॅनलाइन पद्धतीने केली. त्यामुळे आजच्या काळात खरेदीचा हा उत्तम पर्याय आहे.- अनिल सोनवणेमागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी चायनीज रोषणाईचे साहित्यांची घट झाली असून, भारतीय उत्पादन असलेल्या साहित्यांची मागणी ग्राहक करत आहे. नागरिकांकडून अशा वस्तूंना मागणी वाढल्यामुळे आम्ही यावर्षी चायनीज उत्पादने कमी करून स्वदेशी साहित्य विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात ठेवले आहे. तसेच चायनीजच्या तुलनेत भारतीय वस्तूंचे दर जवळपास सारखेच झाले आहे.- चेतन पाटील, विक्रेता

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सवonlineऑनलाइन