शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

शिवसेनेची गांधिगिरी : ‘ही कसली भाजपची लाट, डेंग्यूने लावली नाशिकची वाट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 16:25 IST

डासांचा वाढता प्रादूर्भाव नागरिकांच्या जीवावर उठला असताना डास प्रतिबंधात्मक औषध-धूर फवारणी करणाऱ्या ठेकेदाराला पाठीशी घालून कुचकामीऔषध फवारणी व रॉकेल टाकून धूर फवारणीचा देखावा नागरिकांपुढे केला जात असल्याचा आरोप यावेळी विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी केला. शहरातील रुग्णालये ओसंडून वाहत असून १ हजार ८५३ साथीच्या आजाराचे संशयित रुग्ण आढळून आले असून १३६ रुग्ण डेंग्यू, स्वाईनफ्ल्यू सदृश्य असल्याचे निष्पन्न झाल्याचा सरकारी आकडा आहे.

नाशिक : शिवसेनेकडून ‘गांधीगिरी’ आंदोलनाची अपेक्षा खरे तर कोणी करू शकत नाही; मात्र बुधवारी (दि.३) विरोधी पक्ष नेत्याच्या नेतृत्वाखाली विरोधी गटाच्या नगरसेवकांनी चक्क डोक्यावर गांधी टोपी परिधान करत राजीव गांधी भवनात सत्ताधारी पक्षाच्या विरोधात घोषणा देत आरोग्य प्रशासनाच्या गलथान कारभाराचा निषेध नोंदविला. अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांच्या दालनात प्रवेश करुन त्यांना याप्रकरणी जाब विचारला.

शहरात महिनाभरापासून साथीच्या आजारांनी थैमान घातले आहे. डासांचा वाढता प्रादूर्भाव नागरिकांच्या जीवावर उठला असताना डास प्रतिबंधात्मक औषध-धूर फवारणी करणाऱ्या ठेकेदाराला पाठीशी घालून कुचकामी औषध फवारणी व रॉकेल टाकून धूर फवारणीचा देखावा नागरिकांपुढे केला जात असल्याचा आरोप यावेळी विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी केला. शहरातील रुग्णालये ओसंडून वाहत असून १ हजार ८५३ साथीच्या आजाराचे संशयित रुग्ण आढळून आले असून १३६ रुग्ण डेंग्यू, स्वाईनफ्ल्यू सदृश्य असल्याचे निष्पन्न झाल्याचा सरकारी आकडा आहे. शहरात साथीच्या आजारांसह डासांपासून फैलावणा-या आजारांनी नुसते डोके वर काढलेले नाही, तर संपुर्ण शहरालाच आपल्या घेºयात घेतले आहे; मात्र अशा अवस्थेतही महापालिकेचा आरोग्य विभाग सुस्तावलेला आहे. विलास शिंदे, संतोष गायकवाड, श्याम साबळे, डी.जी.सुर्यवंशी, प्रवीण तिदमे, प्रशांत दिवे,दिपक दातीर, दिलीप दातीर, भागवत आरोटे, राधा बेंडकुळे, जयश्री खर्जुल, ज्योती खोले, सुनिता कोठुळे आदि उपस्थित होते.

असे झालेत आरोपडुप्लीकेट डास प्रतिबंधात्मक औषधांचा फवारणीसाठी होतोय वापर.फोटोसेशनसाठी स्वच्छता मोहिमेचा देखावा.कामे केल्याचे फोटो आयुक्तांना पाठविण्याची अती घाई, नागरिकांना संकटात नेई.प्रत्यक्षपणे कामे करण्यास, लोकजागृती, प्रबोधन करण्यास टाळाटाळ.गावठाण, स्लम वसाहतींकडे दुर्लक्ष. 

‘दत्तक पित्याचा आदेश’ सोपविलामहापालिकेच्या विरोधी पक्षाच्या हाती लागलेला उपरोधिक भाषेतील ‘दत्तक पित्याचा आदेश’ची प्रत यावेळी बोर्डे यांना विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी सोपविली.आरोग्य प्रशासनाचा गलथान व निष्क्रीय कारभार नगरसेवकांनी बोर्डे यांच्या लक्षात आणून दिला. उपरोधिक आंदोलनानंतर शिवसेनेकडून ‘शिवसेना स्टाईल’ने आंदोलन करत बेजबाबदार अधिकाºयांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा बोरस्ते यांनी दिला. तसेचमुख्यमंत्र्यांचा आदेश आल्यानंतरच खºयाखुºया औषधांचा वापर डास मारण्यासाठी करणार का? असा रोखठोक प्रश्नही विचारला. या उपरोधिक आंदोलनानंतर शिवसेनेकडून ‘शिवसेना स्टाईल’ने आंदोलन करत बेजबाबदार अधिकाºयांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला.--

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाHealthआरोग्य