शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
5
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
6
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
7
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
8
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
9
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
10
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
11
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
12
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
13
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
14
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
15
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
16
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
17
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
18
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
19
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
20
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा

सातपूरला गणपती बाप्पाचे उत्साहात विसर्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 12:30 AM

‘निरोप घेतो देवा, आम्हा आज्ञा असावी, चुकले आमुचे काही त्याची क्षमा असावी, आभाळ भरले होते तू येताना, आता डोळे भरून आलेत, तुझे लक्ष त्यांच्यावर आयुष्यभर असेच राहू दे. त्यांना सर्वांना सुखात, आनंदात आणि समाधानात ठेव,’ अशी प्रार्थना आणि गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, असे अशी विनवणी करीत ढोल ताशांच्या गजरात गुलालाची उधळण करीत मिरवणुकीद्वारे विसर्जन करून बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला.

सातपूर : ‘निरोप घेतो देवा, आम्हा आज्ञा असावी, चुकले आमुचे काही त्याची क्षमा असावी, आभाळ भरले होते तू येताना, आता डोळे भरून आलेत, तुझे लक्ष त्यांच्यावर आयुष्यभर असेच राहू दे. त्यांना सर्वांना सुखात, आनंदात आणि समाधानात ठेव,’ अशी प्रार्थना आणि गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, असे अशी विनवणी करीत ढोल ताशांच्या गजरात गुलालाची उधळण करीत मिरवणुकीद्वारे विसर्जन करून बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. सातपूर परिसरात २८ हजार ३६२ मूर्ती संकलित करण्यात आल्या असून, जवळपास २० टन निर्माल्य जमा झाले आहे.गेल्या ११ दिवसांपासून घराघरांमध्ये विराजमान झालेल्या गणपती बाप्पाला भरपावसात भावपूर्ण निरोप देण्यात आला. महानगरपालिकेने सातपूर परिसरात नंदिनी नदी पूल, गंगापूर धबधबा, सोमेश्वर धबधबा, चांदशी पूल, मते नर्सरी पूल याठिकाणी मूर्ती विसर्जनाची सोय केली होती. याशिवाय पाइप लाइनरोड, अशोकनगर पोलीस चौकी, शिवाजीनगर सूर्यामर्फी चौक आदी ठिकाणी कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात आली होती. या कृत्रिम तलावातदेखील भाविकांनी श्रींचे विसर्जन केले. घराघरातील आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मिरवणुकीद्वारे ढोल-ताशांच्या गजरात गुलाल उधळत बाप्पाला निरोप दिला.सातपूर गावातील गणेशोत्सव मंडळांनी मिरवणूक काढून गणपतीचे विसर्जन केले. नंदिनी पुलाजवळ जनता महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वयंसेवक म्हणून कामगिरी बजावली.सातपूर परिसरातील मूर्ती संकलननंदिनी नदी पूल सातपूर-अंबड लिंकरोड-४,९६३,गंगापूर धबधबा-५,८२८,सोमेश्वर परिसर-१,१५४,चांदशी पूल, आनंदवली-१,३४८मते नर्सरी पूल-२,८४६,आयटीआय पूल-८,३०६,पाइपलाइन रोड, कृत्रिम तलाव-९१६,अशोकनगर पोलीस चौकी,कृत्रिम तलाव-१,५२१,शिवाजीनगर सूर्यामर्फी चौक, कृत्रिम तलाव -१,४८२,एकूण गणेशमूर्ती जमा - २८,३६२

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सवNashikनाशिक