जुगार अड्ड्यावर छापा; २१ जणांना अटकदे

By Admin | Updated: November 28, 2015 22:55 IST2015-11-28T22:53:56+5:302015-11-28T22:55:59+5:30

जुगार अड्ड्यावर छापा; २१ जणांना अटकदे

Gambling raid; 21 people are arrested | जुगार अड्ड्यावर छापा; २१ जणांना अटकदे

जुगार अड्ड्यावर छापा; २१ जणांना अटकदे

वळाली कॅम्प : भगूर - लहवित रस्त्यावरील गारवा हॉटेलजवळील जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारून २१ जुगाऱ्यांना अटक करून ६ लाखांचा ऐवज जप्त केला आहे.
भगूर येथील विजय भागवत हा चालवत असलेल्या पत्त्याच्या क्लबवर मंगळवारी सायंकाळी पोलीस उपायुक्त डॉ. श्रीकांत धिवरे यांनी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार देवळाली कॅम्प पोलीस पथकाला सोबत घेऊन छापा मारला. यावेळी पत्त्याचा जुगार खेळणाऱ्या नीलेश गोरे, अशोक मोजाड, बाळू महाले, जालिंदर देशमुख, विक्रम सोनवणे, सुधीर साळवे, अर्जुन खैरे, अमीर अहमदखान, अरविंद गवळी, साईनाथ पंडोरे, दीपक कुलथे, संजय शिंदगुडे, नंदकुमार चव्हाण, राजेंद्र जाधव, सुदाम मुठाळ, लहानू लोहकरे, शंकर राव, दिलीप मोरे, दत्तू चिडे, लक्ष्मण माने व क्लबचालक विजय भागवत यांना अटक केली. त्यांच्याकडून ८० हजार ८४० रुपये रोख, १८ मोबाइल, १८ वाहने, एक टीव्ही संच असा एकूण ५ लाख ९० हजार ८०० रुपये इतका ऐवज जप्त करण्यात आला आहे. (वार्ताहर)

Web Title: Gambling raid; 21 people are arrested