शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जुगाऱ्यांना कोरोनाची भीती नाही; गर्दीत सर्रास रंगताहेत डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 20:49 IST

शहरातील जुगार अड्डे मात्र रंगात आले आहेत. सर्वत्र बंद असल्यामुळे जुगाºयांनी एकत्र येत पत्ते कुटण्याचा सपाटा लावला आहे. प्रत्येक जुगार अड्ड्यावर किमान पंधरा ते पंचवीस जुगारी एकत्र येऊन सर्रासपणे जुगार रंगवित असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत.

ठळक मुद्देपोलीस यंत्रणेचेही जुगार अड्ड्यांकडे दुर्लक्ष गुन्हे शोध पथकांनाही जुगा-यांचे ठावठिकाणे ज्ञात

नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहर व परिसरात जिल्हा प्रशासनाकडून खबरदारीच्या उपाययोजना राबविल्या जात असून, साथरोग कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात असताना दुसरीकडे मात्र शहरात चोरीछुप्या पद्धतीने चालविल्या जाणा-या जुगार अड्ड्यांवर गर्दी दिसून येत आहे. जुगारी मोठ्या संख्येने एकत्र येत पत्त्यांचा डाव रंगवत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून धार्मिक सण, उत्सव, यात्रादेखील स्थगित करण्यात आल्या आहेत. शाळा, महाविद्यालये, मंदिरे, उद्याने, आठवडे बाजार, मॉल्सदेखील बंद करण्यात आले आहेत. एवढेच नव्हे तर ३१ मार्चपूर्वी होणारे विवाह समारंभ, सोहळेदेखील रद्द करण्याचे आदेश दस्तुरखुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत. नागरिकांची गर्दी शक्य तितक्या प्रमाणात कमी करण्याचा प्रयत्न सर्वत्र होत आहे. त्याचप्रमाणे नागरिकांनाही गर्दी टाळण्याचे आवाहन केले जात आहे. दरम्यान, शहरातील जुगार अड्डे मात्र रंगात आले आहेत. सर्वत्र बंद असल्यामुळे जुगाºयांनी एकत्र येत पत्ते कुटण्याचा सपाटा लावला आहे. प्रत्येक जुगार अड्ड्यावर किमान पंधरा ते पंचवीस जुगारी एकत्र येऊन सर्रासपणे जुगार रंगवित असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. या जुगा-यांना कोरोनाची कुठलीही भीती नसल्याचे चित्र असून, पोलीस यंत्रणेचेही जुगार अड्ड्यांकडे दुर्लक्ष झाल्याने जुगार अड्ड्यांना कोरोना कालावधीत सुगीचे दिवस आल्याचे बोलले जात आहे. गर्दीच्या सर्व ठिकाणांवर शासकीय यंत्रणा लक्ष ठेवून असताना जुगार अड्ड्यांकडेही लक्ष देणे गरजेचे असून थेट धडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.जुगार अड्डे चालविणे कायद्याने गुन्हा असला तरी चोरट्या मार्गाने नजरेस येणार नाही, अशा ‘भूमिगत’ जागांची निवड करत तेथे जुगार खेळला व खेळविला जात आहे. शहरातील सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत असे जुगाराचे डाव राजरोसपणे रंगत असल्याचे नागरिकांनी सांगितले. संबंधित पोलीस ठाण्यांच्या गुन्हे शोध पथकांनाही जुगा-यांचे ठावठिकाणे ज्ञात असूनही त्यांच्याकडून अज्ञात असल्याचे भासविले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी जुगार अड्ड्यांवर धडक कारवाईची मोहीम हाती घेण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस