फऱ्या रोगाने गोऱ्ह्याचा मृत्यू
By Admin | Updated: September 12, 2016 00:27 IST2016-09-12T00:27:32+5:302016-09-12T00:27:42+5:30
फऱ्या रोगाने गोऱ्ह्याचा मृत्यू

फऱ्या रोगाने गोऱ्ह्याचा मृत्यू
लासलगाव : जनावरांना प्रतिबंधक लसीकरण लासलगाव : येथील मोकाट जनावरातील एका गोऱ्ह्याचा मृत्यू फऱ्या रोगाची लागण झाल्याचे निफाड पंचायत समितीचे तालुका पशुसंवर्धन वैद्यकीय अधिकारी पी.एस.महाजन यांनी जाहीर केल्यानंतर पशु वैद्यकीय विभागाची यंत्रणा खडबडून जागी झाली
आहे.
शनिवारी व रविवारी दोन दिवसात जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. पी. आय. फालक यांच्या मार्गदर्शनाखाली निफाड पंचायत समितीचे तालुका पशुसंवर्धन अधिकारी पी. एस. महाजन तसेच लासलगावचे प्रभारी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. पाडळे यांच्या नेतृत्वाखाली पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या फरया रोग नियंत्रण प्रतिबंधक लसीकरणाची विशेष कृती दलातील पशुधन पर्यवेक्षक .वाघ , गंभीरे , भामरे ,दिघोळीई , बोरोले या डॉक्टरांनी लासलगाव येथील विविध जनावरांची वैद्यकीय तपासणी करीत असुन सुमारे दोनशे पन्नास जनावरांना फरया रोग नियंत्रण प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले आहे.येत्या चार दिवसात सुमारे एक हजारावर जनावरांना फरया रोग नियंत्रण प्रतिबंधक लसीकरण करण्यात येणार आहे असे श्री महाजन यांनी सांगितले.
दरम्यान , फरया रोगांची लागण होऊ नये याकरीता जनजागृती करण्यासाठी पशुपालक व दुग्ध संकलन केंद्र चालकांच्या विशेष बैठकीचे आयोजन येत्या दि.१४ सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता क्षिरसागर डेअरी पिंपळगाव नजीक येथे क्षिरसागर डेअरी प्रॉडक्टचे संचालक दत्तात्रय क्षिरसागर व पंचायत समतिी सदस्य प्रकाश पाटील यांनी केले आहे .या बैठकीला निफाड पंचायत समतिीचे तालुका पशु संवर्धन अधिकारी पी.एस.महाजन तसेच लासलगावचे प्रभारी पशु वैद्यकीय अधिकारी डॉ पाडळे हे मार्गदर्शन करणार
आहेत.
तरी या बैठकीला उपस्थित रहावे असे आवाहन क्षिरसागर डेअरी प्रॉडक्टचे संचालक दत्तात्रय क्षिरसागर व पंचायत समिती सदस्य प्रकाश पाटील यांनी केले .(वार्ताहर)