मालेगाव, नांदगाव तालुक्यात गारा

By Admin | Updated: May 6, 2016 00:03 IST2016-05-05T23:26:21+5:302016-05-06T00:03:27+5:30

ॅपिकांचे नुकसान : दिवसभर ऊन-सावलीचा खेळ

Gale in Malegaon, Nandgaon taluka | मालेगाव, नांदगाव तालुक्यात गारा

मालेगाव, नांदगाव तालुक्यात गारा


मालेगाव : शहरासह तालुक्यात गुरुवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. तालुक्यातील चिंचावड व वडेल भागात गारपीट झाली.
सकाळपासूनच शहर परिसरात कमालीचा उकाडा जाणवत होता. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास शहरात रिमझिम पावसाचा शिडकावा झाला तर सायंकाळी विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. सकाळपासून ऊन सावल्यांचा खेळ सुरू होता. अचानक आलेल्या तुरळक पावसाच्या सरींमुळे वातावरणात गारवा पसरला.
तालुक्यातील वडेल परिसरात सायंकाळी विजांच्या कडकडाटासह बेमोसमी पावसासह गारपीट झाली. बोराच्या आकाराच्या गारा होत्या. शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेल्या कांद्याचे नुकसान झाले. सुमारे अर्धातास गारपीट पाऊस सुरू होता. अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची धावपळ झाली. चिंचावड परिसरात कमालीचा उकाडा जाणवत होता. सायंकाळी तुरळक गारांचा पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांची धांदल उडाली.
नांदगाव तालुक्यातील तळवाडे येथे गुरूवारी सायंकाळी पंधरा मिनीटे गारिपट झाली. वीजांच्या गडगटासह पावसाने हजेरी लावली. मध्यम ते लहान आकाराची गार पडली. तर डाँक्टरवाडी येथे चाळीसगाव रस्याकडच्या शिवारात वीज पडून परशराम नारायण बागुल यांचा बैल ठार झाला. दरम्यान शहरासह तालुक्यातील अनेक भागात पावसाच्या हालक्या सरी पडल्यात.दुपारी चार नंतर अचानक ढग भरु न आकाश झाकोळले गेले,त्यानंतर हलक्या सरी पडल्या.

Web Title: Gale in Malegaon, Nandgaon taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.