नॅशपे इंडिया क्रि केट स्पर्धेत गजरा गु्रप अजिंक्य

By Admin | Updated: June 17, 2014 00:11 IST2014-06-17T00:03:02+5:302014-06-17T00:11:45+5:30

नॅशपे इंडिया क्रि केट स्पर्धेत गजरा गु्रप अजिंक्य

Gajra Group champions in Nashpi India Krit Kate competition | नॅशपे इंडिया क्रि केट स्पर्धेत गजरा गु्रप अजिंक्य

नॅशपे इंडिया क्रि केट स्पर्धेत गजरा गु्रप अजिंक्य

 

नाशिक : नॅशनल अकॅडमी फॉर स्पोटर््स अ‍ॅण्ड फिजिकल एज्युकेशन (नॅशपे) इंडिया व पार्कसाईड रेसिडेन्सस कॉर्पोरेट क्रि केट अजिंक्यपद स्पर्धेत गजरा उद्योग गु्रपने अजिंक्यपद पटकावले़ महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्रला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले़
भोसला मीलिटरी स्कूलच्या मैदानावर मागील तीन दिवसांपासून या स्पर्धा सुरू होत्या़ जिल्हाभरातून ३२ कंपन्यांच्या संघांनी या स्पर्धेत भाग घेतला होता़ उपांत्य फेरीमध्ये गजरा गु्रपविरुद्ध विजिंट टेक्नॉलॉजिस्ट आणि महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र व जिंदल यांच्यात लढती झाल्या होत्या़ आपली लढत जिंकत महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र व गजरा गु्रप अंतिम फे रीत पोहचले होते़
अंतिम सामन्यात प्रथम फ लंदाजी करताना गजरा गु्रपच्या संघाने निर्धारित आठ षटकांमध्ये चार गड्यांच्या मोबदल्यात ९० धावा फ टकावल्या़ यामध्ये कपिल याने अर्धशतक ठोकत संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली़ हे आव्हान घेऊन
फलंदाजीस उतरलेल्या महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्रची सुरुवात खराब झाली़ सरासरी प्रत्येक षटकासाठी साडेअकरा धावांची गती आवश्यक असताना एकापाठोपाठ एक फ लंदाज बाद होत गेले़
अखेर आठ षटकांत सात गडी गमावत महिंद्रचा संघ ८६ धावा करू शकला़ गजरा गु्रपने २२ धावांनी दणदणीत विजय संपादन केला़ (प्रतिनिधी)

Web Title: Gajra Group champions in Nashpi India Krit Kate competition