शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
4
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
5
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
6
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
7
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
8
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
9
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
10
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
11
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
12
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
13
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
14
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
15
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
16
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
17
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
18
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
19
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
20
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 

अंबड येथे गजानन महाराज प्रगटदिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 00:30 IST

श्री गजानन महाराज भक्तमंडळ मुरारीनगर अंबड यांच्या वतीने सालाबादप्रमाणे यावर्षी ही गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

सिडको : श्री गजानन महाराज भक्तमंडळ मुरारीनगर अंबड यांच्या वतीने सालाबादप्रमाणे यावर्षी ही गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे प्रथम गजानन महाराज भक्त मंडळाचे अध्यक्ष अमोल शेळके व भाग्यश्री शेळके यांनी मुरारीनगर येथील पालखी तळावर गजानन महाराजांच्या मूर्तीला सप्तनिक अभिषेक केला.सावतानगर येथील इच्छामणी गणपती मंदिरात गजानन महाराज प्रकटदिन सोहळ्याचा चित्रमय प्रसंग साकारण्यात आला . यावेळी जगताप यांनी गजानन विजय या ग्रंथाच्या अध्यायाचे वाचन केले. यावेळी जमलेल्या भक्तांनी गजानन महाराज की जय म्हणत दर्शनासाठी गर्दी केली. यावेळी शेगाव येथून आलेल्या भजनी मंडळाने गण गण गणांत बोते या सह चला शेंगावाला जाऊ, गाडी घुंगराची निघाली शेंगावाला अशी अनेक महाप्रसादाचे देण्यात आले. दुपारी सावतानगर येथून श्री गजानन महाराजांच्या पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीच्या मार्गावर पाण्याचे फवारे मारण्यात आले होते सर्व पालखी मार्ग स्वच्छ करण्यात आला होता पालखी मार्गावर ठिकठिकाणी रांगोळ्या काढण्यात येत होत्या सर्वत्र भगवे ध्वज लावल्यामुळे वातावरण भक्तिमय झाले होते. संध्याकाळी पालखीचे डीजीपीनगर येथील माउली लॉन्स चौकात फटाक्यांच्या आतषबाजीत सर्व पक्षीय व विविध संस्था व मंडळांच्या वतीने स्वागत करण्यात आले.

टॅग्स :NashikनाशिकGajanan Maharajगजानन महाराज