गजानन शेलार यांच्या विरोधात गुन्हा दाखल
By Admin | Updated: April 15, 2017 01:33 IST2017-04-15T01:33:31+5:302017-04-15T01:33:47+5:30
गजानन शेलार यांच्या विरोधात गुन्हा दाखल

गजानन शेलार यांच्या विरोधात गुन्हा दाखल
नाशिक : शासकीय विश्रामगृहातील खोली बदलून देण्याच्या कारणावरून व्यवस्थापकांना शिवीगाळ करून मारहाण केल्याच्या आरोपामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक गजानन शेलार यांच्या विरोधात मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
शासकीय विश्रामगृहात कौतिक माधवराव टाकेकर (५६, रा. शिंगवेबहुला, देवळाली कॅम्प) हे गुरुवारी (दि़ १३) दुपारच्या सुमारास कर्तव्यावर होते़ दुपारी तीन वाजेच्या सुमारास गजानन शेलार कार्यकर्त्यांसमवेत शिवनेरी विश्रामगृहावर आले. त्यांनी खासदार रामदास तडस यांना देण्यात आलेली खोली बदलून देण्याच्या कारणावरून व्यवस्थापक संपत चौधरी, अशोक देवळे व कर्मचारी सुनील बागुल यांना शिवीगाळ केली. तर शेलार यांच्यासमवेत असलेल्या एका कार्यकर्त्याने टाकेकर यांना बेदम मारहाण केली. इतकेच नव्हे तर शेलार व त्यांच्या कार्यकर्त्याने कुटुंबीयांना जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे टाकेकर यांनी फिर्यादीत म्हटले
आहे़ (प्रतिनिधी)